Kangana Ranaut esakal
Premier

Kangana Ranaut: 'आपण लावलेला जावईशोध हा..'; सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबत कंगानानं पोस्ट शेअर केल्यानंतर विश्वास पाटलांचं ट्वीट

Kangana Ranaut: कंगनाच्या याच पोस्टबाबत लेखक विश्वास पाटील (vishwas patil) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.

priyanka kulkarni

Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) काही दिवसांपूर्वी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel ) यांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की, "सरदार वल्लभभाई पटेल यांची इंग्रजी भाषा फारशी चांगली नव्हती." आता कंगनाच्या याच पोस्टबाबत लेखक विश्वास पाटील (vishwas patil) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले.

कंगनाची पोस्ट

कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणे हा अत्यंत रोमांचकारी अनुभव होता, त्यांना त्यांची खुर्ची मिळाली नव्हती कारण त्यांना इंग्रजी भाषा फारशी चांगली नव्हती, तरीही त्यांनी राष्ट्राला हाताशी धरले होते."

"या राष्ट्रीय नायकाच्या अशा योग्यतेने माझ्यामध्ये आणि माझ्या तेजस चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये अभिमान आणि राष्ट्रवादाची भावना जागृत झाली.", असंही कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं.

विश्वास पाटील यांचे ट्वीट

विश्वास पाटील यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "कंगना जी, सरदार वल्लभाई पटेल हे बॅरिस्टर होते ! लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरी पूर्ण केली होती. ते अहमदाबाद कोर्टातले एक लीडिंग फौजदारी वकील होते. त्यांचे इंग्रजीवर इतके प्रभुत्व आणि मास्टरी होती की, अनेक ब्रिटिश जज त्यांचा कोर्टामधला प्रतिवाद ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. तेच नव्हे तर त्यांचे थोरले बंधू विठ्ठलभाई पटेल हे सुद्धा बॅरिस्टर होते. ते सुद्धा निष्णात वकील होते. या दोघा भावांचे इंग्रजीवरील असामान्य प्रभुत्व आणि त्यांची व्याख्याने याबद्दल इतिहासामध्ये अनेक दंतकथा व सत्यकथा प्रचलित आहेत. त्यामुळे वल्लभाईंना इंग्रजी येत नव्हते असा आपण लावलेला जावईशोध हा आपल्या अज्ञानाचा भाग समजायचा का ?"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT