Kiran Mane  Esakal
Premier

Kiran Mane : 'ते नजरेला नजर देऊ शकले नाहीत' ; मोदी-राहुल यांच्या व्हायरल व्हिडिओवर किरण मानेंची पोस्ट

Kiran Mane Post On Viral Video : अभिनेते किरण माने यांनी मोदी आणि राहुल यांच्या हस्तांदोलनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किरण यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi & Narendra Modi : सध्या भारतातील राजकारण चांगलंच चर्चेत आहे. दहा वर्षांनंतर लोकसभेत पहिल्यांदा विरोधी पक्षाला नेता मिळाला असून राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी बिनविरोध नेमणूक झाली. या घटनेवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच किरण माने (Kiran Mane ) यांनी पुन्हा मोदी (Narendra Modi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर त्यांची प्रतिक्रिया मांडली.

व्हायरल व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये मोदी (Narendra Modi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) ओम बिर्ला (Om Birla) यांचे अभिनंदन केल्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन करत आहेत. यावेळी मोदींची नजर राहुल यांच्यासमोर काहीशी झुकलेली पाहायला मिळाली. त्यांच्या कृतीवरून सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

किरण यांची पोस्ट

सोशल मीडियावर किरण यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला ,"...आणि एक दिवस त्याच राहुलने नजर भिडवल्यावर, 'ते' नजरेला नजर देऊ शकले नाहीत !

इसलिए,

दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे...

जब कभी हम सामने आ जाएं, तो शर्मिंदा न हों !

#शेवटचंच " असं कॅप्शन दिलं आहे. सोबत केतकी चितळेच्या नाराज प्रतिक्रियेचा व्हिडीओ देखील त्यांनी लावला आहे.

"बडे बडे देशो मे, छोटी छोटी बाते होती हे..... " अशी प्रतिक्रिया एकाने या व्हिडिओवर दिली आहे तर एकाने "दादा..... एकचं नंबर.....लईभारी " असं म्हणत किरण मानेंचं कौतुक केलं आहे.

केतकी चितळेने (Ketaki Chitale) किरण यांच्यावर टीका केल्यावर ते सध्या तिला संधी मिळेल तेव्हा ट्रोल करताना पाहायला मिळत आहेत. केतकीने भाजपावर व्यक्त केलेला राग, तिची नाराजी यावर किरण यांनी दिलेली प्रतिक्रियाही चर्चेत होती. सोशल मीडियावर यांचा वाद चांगलाच गाजला होता.

काही दिवसांपूर्वी किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राम मंदिरात होत असलेल्या गळतीसंदर्भात केंद्र सरकारला खडेबोल सुनावले होते. ,"शेतकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत देश देशोधडीला लागलेला आहेच. पण ज्या गोष्टीवर तुम्ही मतं मागितलीत ते राम मंदिरही तुम्हाला धड बांधता आलेलं नाही. एका पावसात गाभारा गळायला लागला. गाभाऱ्यातून पाणी बाहेर काढायचीही व्यवस्था नाही. लज्जास्पद आणि संतापजनक आहे हे. समस्त हिंदूंचा अपमान आहे. लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या. लायक माणूस खुर्चीवर बसवा. जय श्रीराम" अशी संतप्त पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT