kiran rao  sakal
Premier

Kiran Rao: आमिर खानशी घटस्फोट घेतल्यानंतर कसं आयुष्य जगतेय किरण राव; खुलासा करत म्हणाली- तीन वर्ष झाली पण...

Kiran Rao Aamir Khan Divorce: अभिनेता आमिर खान याची दुसरी पत्नी किरण राव हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.

Payal Naik

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चाहत्यांमध्ये चर्चेत होता. त्याने आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी घटस्फोट घेतला होता. त्यांनी तीन वर्षांपूर्वी घटस्फोटाची बातमी देत सगळ्यांना चकीत केलं होतं. ते वेगळे होत आहेत यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र आपल्यातील मतभेदांमुळे आपण वेगळे होत आहोत असं त्यांनी सांगितलं होतं. आता घटस्फोटानंतर आपलं आयुष्य कसं आहे यावर किरण राव व्यक्त झाली आहे. आपण या घटस्फोटानंतर खूप आनंदी आहोत असं तिचं म्हणणं आहे.

किरणने नुकतंच 'लापता लेडीज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यासाठी तिची प्रचंड प्रशंसा करण्यात आली. तिचं खूप कौतुक झालं. आता 'फेय डिसुझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना किरणने तिच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. याबद्दल बोलताना किरण म्हणाली, 'मला वाटतं नात्याला प्रत्येकवेळी नव्याने नाव देण्याची गरज आहे. कारण जसे जसे आपण मोठे होतो तसे माणसाची रूपं बदलतात. आपण बदलतो. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते आणि आपल्याला वाटतं की या व्यक्तीकडून त्या गरजा पूर्ण होती. मी प्रामाणिकपणे सांगते या माणसाने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. हा एक आनंदी घटस्फोट आहे.'

ती पुढे म्हणाली, 'मला वाटतं की एकटेपण हीच ती भावना आहे ज्याची अनेकांना चिंता असते जेव्हा त्यांच्या आयुष्यातील एखादा व्यक्ती निघून जातो किंवा घटस्फोट होतो. पण मला अजिबात एकटेपणा वाटत नाहीये. मला दोन्ही कुटुंबाचा खूप पाठिंबा मिळाला आहे. त्याचं कुटुंब आणि माझं कुटुंब. यानंतर केवळ चांगल्या गोष्टी होतील. माझ्या मुलामुळे मला मुळीच एकटेपण वाटत नाही. माझ्यात आणि आमिरमध्ये खूप प्रेम होतं. खूप सन्मान होता. हसू होतं, मस्ती होती. आम्ही एकमेकांसाठी होतो. मी त्यांना गमावू इच्छित नव्हती. पण जे झालंय ते चांगलं झालंय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT