mahesh manjrekar  esakal
Premier

Mahesh Manjrekar: बिग बॉस मध्ये रितेशला घेण्याबद्दल अखेर बोलले महेश मांजरेकर, म्हणाले- त्यांना जे हवंय ते कदाचित...

Mahesh Manjarekar on Ritiesh Deshmukh: लोकप्रिय अभिनेते महेश मांजरेकर यांनी रितेशच्या सूत्रसंचालनावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

Payal Naik

Mahesh Manjarekar on BIgg Boss Marathi 5: 'बिग बॉस मराठी ५' नुकताच मोठ्या थाटामाटात सुरू झाला आहे. या सीझनमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला आल्या, या सीझनमध्ये समुद्राची थीम असलेलं घर प्रेक्षकांना पाहायला मिळालं. तर कीर्तनकारांपासून अनेक कलाकार या घरात आले. त्यातच आणखी एक मोठा बदल झाला तो म्हणजे या कार्यक्रमाचा बदलेला होस्ट. या गेले चार सीझन लोकप्रिय मराठी अभिनेते महेश मांजरेकर हे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. मात्र या सीझनपासून अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालन करताना दिसत आहे. त्यावर आता महेश मांजरेकर यांनी मौन सोडलं आहे.

मला असं वाटायचं की

बिग बॉस मराठी म्हणजे सगळ्यात आधी महेश मांजरेकर यांचा चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर यायचा. त्यात अचानक कार्यक्रमाचा होस्ट बदलल्याचं सांगितल्याने हा निर्णय का घेतला, वाहिनीमध्ये आणि त्यांच्यात काही वाद झाला का, महेश यांना का बदललं असा प्रश्न नेटकरी विचारत होते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महेश यांनी यावर उत्तर दिलं आहे. महेश यांनी अभिनेते अमोल परचुरे यांना मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ते म्हणाले, 'मी जेव्हा सुरु केलं, तेव्हा माझं फक्त वर्षभराचंच कॉन्ट्रॅक्ट होतं. मला असं वाटायचं की, काय आहे हे, एकत्र बसून बघायचं काय हा कार्यक्रम बघायचा. कारण मी होस्ट करण्याआधी कधीच बिग बॉस पाहिलं नव्हतं. पण मी होस्ट करणार तेव्हा काही एपिसोड पाहिले तेव्हा वाटलं की हा गेम भारी आहे.'

त्यांना जे हवंय ते कदाचित

ते पुढे म्हणाले, 'त्यानंतर त्या एका सिझनचे चार सिझन झाले. पण पाचव्या सिझनवेळी त्यांना खरंच असं वाटलं असेल की, मी जरा रिपीटेटिव्ह होतोय. त्यांना जे हवंय ते कदाचित माझ्यात नसेल. जेव्हा पहिल्यांदा मला घेतलं तेव्हा मला असं वाटलं की, अरे मी का, इतरही स्टार आहेतच की. पण आता जेव्हा रितेशचं नाव ऐकलं तेव्हा वाटलं, की अरे व्हा... नशिब त्यांनी रितेशला पहिल्याच सिझनला घेतलं नाही, नाहीतर मग मी ते केलंच नसतं.'

मी खूप सकारात्मक

महेश पुढे म्हणाले. 'मला असं वाटतं की, तो त्याच्यामध्ये त्याचं काहीतरी आणले. तसंही चार वर्ष मी खूप एन्जॉय केलाय तो कार्यक्रम. बदल करणं हे त्यांच्या हातात आहे. पण हा सिझनही मी तितक्याच आवडीने पाहीन. मी जे केलंय त्याचं मला खूप समाधान आहे. लोकांनाही बदल हवा आहे. तो खूप छान कार्यक्रम आहे आणि रितेश करतोय त्यासाठी मी खूप सकारात्मक आहे. रितेश हा शो गाजवेल असंही माझा विश्वास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT