Malaika Arora & Arjun Kapoor Esakal
Premier

Malaika Arora & Arjun Kapoor Breakup: मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप; नातं का संपलं?

सेलिब्रिटी कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर वेगळे झाले. सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगलीये.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील चर्चित कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालंय. पिंकव्हीला वेबसाईटने याबाबतची माहिती शेअर केलीये. पाच वर्षांनंतर मलायका आणि अर्जुनने एकमेकांशी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे कारण?

या जोडीने त्यांचा ब्रेकअप अजून जाहीर केला नसला तरीही त्यांचं नातं तुटल्याची चर्चा बराच काळ होती. पिंकव्हिलाने त्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संपर्क केल्यावर ही बातमी त्यांनी उघड केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "मलायका आणि अर्जुन यांचं नातं खूप खास होतं आणि ते दोघंही एकमेकांच्या हृदयात विशेष स्थान कायम ठेवतील. त्यांनी वेगळं राहायचं ठरवलंय आणि या प्रकरणी त्यांनी मौन पाळलंय. ते कुणालाही त्यांच्या नात्यात ढवळाढवळ करू देणार नाही.

त्यांचं नातं खूप सुंदर होतं पण दुर्दैवाने ते आता वेगळे झाले आहेत. याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात काही वाद झाला आहे. ते एकमेकांचा प्रचंड आदर करतात आणि ते एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांचं नातं खूप जपलं आहे. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला तरीही ते एकमेकांना कायम आदर देत राहतील. ते दोघंही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि या भावनिक वेळी त्यांना त्यांचा वेळ मिळावा अशी त्यांची त्यांच्या चाहत्यांकडून अपेक्षा आहे."

पाच वर्ष डेटिंग आणि नात्याची कबुली

गेले पाच वर्षं अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावरही त्यांच्या नात्याची कबुली दिली होती पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं टाळत होते. २०१८ ला मलायकाच्या ४५ व्या वाढदिवसादिवशी त्यांनी त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली. मलायका आणि अर्जुनच्या वयात बारा वर्षांचं अंतर होतं.

मलायकाने सलमानचा भाऊ अरबाज खानशी लग्न केलं होतं आणि त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे जो मलायकासोबत राहतो. अरबाजने देखील नुकतंच दुसरं लग्न केलं.

अर्जुनचा लवकरच 'मेरी पत्नी का रिमेक' हा सिनेमा येणार असून या सिनेमात तो राकुल प्रीत सिंह आणि भूमी पेडणेकर बरोबर स्क्रीन शेअर करतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा सुनेत्रा पवारांसह उद्धव ठाकरेंना धक्का; राष्ट्रवादी नगरसेवकांसह ठाकरे गटाचे पदाधिकारी शिवसेनेत

IPO News: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल! Shiprocket अन् Behari Lal Engineering ची बंपर लिस्टिंग; कुणाला सर्वाधिक रिटर्न?

Nagpur School Bomb Threat: शहरातील १८ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी; संघ कार्यालय, केंद्रीय विद्यालयासह प्रसिद्ध शाळांचा समावेश; बीडीडीएस, श्वान पथकाकडून तपासणी

Marathi News Live Updates : संजय राऊतांची निवडणूक आयोगावर सडकून टीका, काय म्हणाले?

Sunetra Pawar: चिमुकली हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आक्रमक; आरोपीवर कठोर कारवाई, फास्ट ट्रॅक कोर्टासाठी हालचाली

SCROLL FOR NEXT