marathi serial  sakal
Premier

Marathi Serials: अरे काय रे ही तुझी भाषा... मालिकांमधील तरुण कलाकार लावतायत मराठी भाषेची वाट? दिग्दर्शक म्हणतात-

मालिकांमध्ये काम करणाऱ्या नवोदित कलाकारांच्या मराठी भाषेवर ज्येष्ठ कलाकार आक्षेप घेताना दिसतायत.

Payal Naik

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. या मालिकांमधील कलाकारही प्रेक्षकांचे आवडते आहेत. मालिकांचा प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्यावरही फरक पडताना दिसतो. कलाकार जसे बोलतात, वागतात तसेच त्यांचे चाहतेही त्यांचं अनुकरण करतात. परंतु, सध्या मालिकांमध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचा दर्जा घसरताना दिसतोय. मालिकांमध्ये बोलल्या जाणाऱ्या चुकीच्या शब्दोच्चारावर घराघरात चर्चा होताना दिसते. कलाकारांच्या तोंडून निघालेले चुकीचे शब्दोच्चार हे प्रेक्षकांच्याही लक्षात येतात. त्यावर आता खुद्द सिनेसृष्टीतूनच नाराजीचे सूर उमटत आहेत. नवोदित कलाकारांकडून या चुका जास्त होत आहेत असं म्हटलं जात आहेत.

हिंदी-इंग्रजीचा भरणा

या चुका मालिका दिग्दर्शित करणाऱ्या दिग्दर्शकाच्या देखील लक्षात येतात. मात्र नव्या कलाकारांना काही सांगायला गेलो तर त्यांना राग येतो असं लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. याबद्दल महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले, 'भाषेची अडचण काही तरुण कलाकारांना अधिक भेडसावताना दिसते. ज्येष्ठ कलाकारांसमोर संवादफेक करताना त्यांना अडचणी येतात. शब्दोच्चार, बोलताना वाक्यात कुठे थांबायचं याचं भान नसतं. सेटवर अनेकांना चुका सांगितल्याचं आवडत नाही आणि भाषा शिकण्याबाबत किंवा व्याकरण जाणून घेण्याबाबत त्यांच्यात उदासीनता दिसून येते. त्यांच्या बोलीभाषेतही हिंदी-इंग्रजीचा भरणा असल्यानं हीच त्यांना ‘कूल’ भाषा वाटते.'

तालमी अन् पाठांतर नको

ते पुढे म्हणाले, 'मालिकेचे कथानक ग्रामीण, पौराणिक किंवा ऐतिहासिक असल्यास भाषेबाबत, लहेजाबाबत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. नव्या पिढीतले बहुतांश कलाकार त्याबद्दल उदासीन आहेत. सदोष शब्दोच्चार, मराठीतील शब्द, म्हणी, वाक्प्रचार माहीत नसणं, वाक्यातील अर्धविराम, स्वल्पविराम, पूर्णविरामाच्या जागा न कळणं या कलाकारांच्या अडचणी आहेत. तर,सोप्या भाषेचा आग्रह, तालमी अन् पाठांतर नको, कमी वाक्यांच्या संवादांसाठी आग्रह, रिटेक्स नकोत म्हणून सोप्या संवादांची मागणी, आयत्या वेळी संवाद बदलण्याचा कलाकारांचा आग्रह या लेखकांच्या अडचणी आहेत.

युवा कलाकारांच्या वागण्यात प्रश्नार्थक हेका

याबद्दल महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, 'युवा कलाकारांच्या वागण्यात अनेकदा अमुकच भाषा आम्ही का वापरायची? असा प्रश्नार्थक हेका दिसतो. त्यांच्या बोलण्यावर इंग्रजीचा प्रभाव अधिक असण्याबद्दल कुणी तक्रार करताना दिसणार नाही. मात्र, मातृभाषा सुस्पष्ट बोलता यायलाच हवी. कलाकार म्हणूनही तुम्ही जी भूमिका साकारत आहात, त्या व्यक्तिरेखेची भाषा, लहेजा, शब्दोच्चार आणि संवादफेक हे जमायला हवं. ज्या माध्यमात तुम्हाला कलाकार म्हणून स्थिर व्हायचं आहे, ती भाषाच अवगत नसेल, तर मग कलाकार म्हणून स्वतःवर काय काम केलं, असा प्रश्न पडायला हवा. मराठीत ण, न आणि ळ उर्दूतले नुक्ते हे कळायला हवेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: संतापलेल्या शेतकऱ्यांकडून रस्त्यावरच धान रोवणी ; ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभाराचा नोंदवला निषेध

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

पु. ल. देशपांडेंची 'बटाट्याची चाळ' नव्या रूपात! रंगभूमीवर रंगणार भव्य सांगीतिक प्रयोग

Latest Marathi News Live Update : 'तावडे हॉटेल' अतिक्रमणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर; पुढील सुनावणी २७ ऑगस्टला होणार

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

SCROLL FOR NEXT