radhika ambani sakal
Premier

तुला सासरा नाही दुसरा बाप मिळालाय! बिदाईला राधिकाला रडताना पाहून मुकेश अंबानींची ती कृती; नेटकऱ्यांचा कौतुकाचा वर्षाव

Radhika Merchant Bidai: राधिका मर्चंट हिच्या बिदाईचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यातील मुकेश अंबानींच्या कृतीचं कौतुक होतंय.

Payal Naik

बिझनेसमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याने १२ जुलै रोजी राधिका मर्चंट हिच्याशी लग्नगाठ बांधली. या लग्नासाठी अनेक बडे कलाकार, बिझनेसमन आणि नेते उपस्थित होते. बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांची मांदियाळी होती. नववधूची एंट्री ते वरमाला या सगळ्या गोष्टींनी सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या सगळ्या विधींचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. मात्र आता त्यातील एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. तो व्हिडिओ आहे राधिकाच्या बिदाईचा. राधिकाच्या पाठवणीचा व्हिडिओ पाहून नेटकरी मुकेश अंबानी यांचं कौतुक करत आहेत असं काय घडलंय नेमकं?

१२ जुलै रोजी राधिकाचा बिदाई सोहळा पार पडला. या सोहळ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत राधिका रडताना दिसतेय. तिच्या पाठीमागे तिचे वडील वीरेन मर्चंट आहेत. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय ते मुकेश अंबानी यांनी. मुकेश राधिका आणि अनंतच्या सोबत चालत आहेत. ते राधिकाकडे सतत पाहत आहेत. राधिकाला पाहून त्यांचे डोळे पाणावलेले पाहायला मिळतायत. आपल्या सुनेला पाहून ते अक्षरशः रडत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एका बापाचं दुःख स्पष्ट दिसत आहे. त्यांचं राधिकासाठीचं प्रेम दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं, 'मुकेश स्वतः रडतायत, ज्या वडिलांना मुलगी आहे तेच या भावना समजू शकतात.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, 'मुकेश अंबानी मनाने किती चांगले आहेत. ते इतके मोठे का आहेत याचा हा पुरावा आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'तुम्ही पाहिलं का मुकेश सर रडतायत.' दुसऱ्या युझरने लिहिलं, 'अंबानींच्या सगळ्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती माझा खूप आवडता आहे. यांच्या बद्दलचा आदर आता आणखी वाढलाय.' अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT