Nach Gam Ghuma esakal
Premier

Nach Gam Ghuma: मैत्री असावी तर अशी! 'नाच गं घुमा'साठी मुक्ताने एकही रुपया घेतला नाही; मधुगंधा सांगितली आठवण

Nach Gam Ghuma: लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने मुक्ताविषयीची एक खास गोष्ट शेअर केली.

priyanka kulkarni

Nach Gam Ghuma: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' (Nach Gam Ghuma) या सिनेमाची. 1 मे ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि नम्रता संभेराव यांची मुख्य भूमिका आहे. घरवाली आणि कामवाली यांच्या जुगलबंदीची गोष्ट असणाऱ्या या सिनेमाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. नुकतंच लोकमत फिल्मी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत या सिनेमाची लेखिका, निर्माती आणि अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णीने (Madhugandha Kulkarni) मुक्ताविषयीची एक खास गोष्ट शेअर केली.

मधुगंधा म्हणाली,"मी आणि मुक्ता एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहोत. आम्ही नेहमीच एकमेकींना भेटत नाही पण आम्ही कायम कनेक्टेड असतो. हा सिनेमा जेव्हा आम्ही लिहीत होतो तेव्हा मला आणि परेशला पहिल्यापासून जाणवलं कि यातील राणीचा रोल मुक्ताने करावा. परेश थोडा साशंक होता म्हणून आम्ही नम्रता आणि मुक्ता दोघींनाही राणी आणि आशाचे स्क्रिप्ट वाचायला दिले आणि त्याच्यानंतर त्याने निर्णय घेतला कि मुक्ता राणीचा रोल करेल. जेव्हा मुक्ताने या सिनेमासाठी होकार दिला तेव्हा तिचं पहिलं वाक्य होतं कि, मला शून्य पैसे दे. माझ्यावर जे पैसे खर्च होणार आहेत ते पैसे तू मेकअप, प्रोडक्ट आणि हेअर्सवर खर्च कर. " असा खुलासा तिने यावेळी केला.

यासोबतच तिने नाच गं घुमा या सिनेमाच्या टायटल ट्रॅकबाबतही अनेक गोष्टी यावेळी शेअर केल्या. "मुक्ता अतिशय उत्तम डान्सर आहे पण तिला स्वतःलाच असं वाटतं कि ती चांगली नाचू शकत नाही पण तिच्या डान्समध्ये एक ग्रेस आहे. ती उत्तम एक्स्प्रेशन्स देते. त्यामुळे ते गाणं अतिशय सुंदर झालेलं आहे. हे टायटल ट्रॅक मुक्ता, सारंग आणि मायराने गावं असा परेशचा निर्णय होता. मुक्ता कशी गाईल याबद्दल मी साशंक होते. तिची मी कॉलेजपासूनची मैत्री असल्यामुळे तिच्या गायनकलेविषयी मला चांगलाच अनुभव आहे पण ते गाणंही सुंदर झालं आणि आता ते गाणं बघताना परेशचा निर्णय किती योग्य होता ते मला जाणवतं. " असं ती म्हणाली.

मुक्ता आणि मधुगंधा या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी आहेत. पुण्याच्या ललित कला केंद्रामध्ये त्यांनी एकत्र नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. मुक्तापेक्षा मधुगंधा तिच्या आईची जास्त जवळची मैत्रीण आहे असा खुलासासुद्धा मुक्ताने यावेळी केला.

सोशल मीडियावर सध्या नाच गं घुमा या सिनेमाची चर्चा जोरदार सुरु आहे. १ मे २०२४ ला रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा टीझर सगळीकडे गाजतोय. मुक्ता आणि नम्रताची केमिस्ट्री सगळ्यांनाच पसंत पडलीये. या सिनेमात या दोघींसोबत सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, शर्मिष्ठा राऊत, मधुगंधा कुलकर्णी, सारंग साठ्ये आणि मायरा वायकुळ यांच्या मुख्य भूमिका आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT