Chandu Champion Box Office Collection  sakal
Premier

रविवारी तिकीट खिडकीवर प्रेक्षकांची झुंबड; 'मुंज्या' आणि 'चंदू चॅम्पियन' कोण ठरलं वरचढ? वाचा दोन्ही चित्रपटांची कमाई

Chandu Champion Box Office Collection: बॉलिवूड चित्रपट 'मुंज्या' आणि 'चंदू चॅम्पियन' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Munjya Box Office: गेली चार महिने ओस पडलेलं बॉलिवूडचं बॉक्स ऑफिस आता जोरदार कमाई करताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झालेला 'मुंज्या' आणि या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चंदू चॅम्पियन' या चित्रपटांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रेक्षकगृहापर्यंत येण्यास भाग पाडलं. पहिल्याच आठवड्यात मुंज्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. तर आता प्रदर्शित झालेल्या चंदू चॅम्पियनने देखील जोरदार कमाईला सुरुवात केली आहे. या रविवारी दोघांमध्ये जोरदार घमासान झालं आहे. या रविवारी कोण कुणावर वरचढ ठरलंय? वाचा दोन्ही चित्रपटांचं कलेक्शन.

'मुंज्या' आणि 'चंदू चॅम्पियन' या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय. मागच्या आठवड्यात ७ जून रोजी प्रदर्शित झालेला 'मुंज्या' अजूनही प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसतोय. या रविवारी म्हणजेच १० व्या दिवशी चित्रपटाने तब्बल ८ कोटी ५० लाखांची कमाई केली आहे. तर या चित्रपटाची एकूण कमाई ५5 कोटी ८० लाखांवर पोहोचली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने आपली प्रोडक्शन व्हॅल्यू पूर्ण केली आहे. हा चित्रपट केवळ ३० कोटींमध्ये बनला होता. आता या चित्रपटाने तब्बल दुप्पट कमाई केली आहे.

तर कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाबद्दल सांगायचं तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी चार कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. तर दुसऱ्या दिवशी सात कोटी कमावले होते. आता रविवारी या चित्रपटाने तब्बल १० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसात एकूण २१ कोटी ७५ लाखांची कमाई केली आहे. आता हे दोन्ही चित्रपट यावर्षीच्या १०० कोटी क्लबमध्ये जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT