nick jonas  esakal
Premier

स्टेजवरून अचानक पळत सुटला निक जोनास, सेक्युरिटीला केला इशारा, प्रियांकाच्या पतीला मारण्याचा होता प्लॅन?

Nick Jonas Left Show After Saw Laser Light: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचं दर्शवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Payal Naik

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने काही वर्षांपूर्वी हॉलिवूडमधील लोकप्रिय गायक निक जोनास याच्याशी विवाह केला. त्यांची जोडीही प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. प्रियांका हिने पती निकसोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला देखील हजेरी लावली होती. निक हा कायमच त्याच्या आणि प्रियांकाच्या चाहत्यांसोबत चांगला वागताना दिसला आहे. मात्र आता त्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो चालू कार्यक्रमात स्टेजवरून उडी मारून थेट बॅकस्टेजला पळताना दिसतोय. सोबतच तो त्याच्या बॉडीगार्डला इशारा देखील करताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून तो असा का पळत सुटला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. वाचा नेमकं काय घडलं.

निक स्टेजवरून पळत का सुटला?

निक जोनस त्याचे भाऊ केविन आणि जो जोनससोबत प्रागमध्ये परफॉर्म करत होता. त्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओमध्ये अचानक पळत खाली उतरताना दिसतोय. त्यानंतर तो त्याच्या बॉडीगार्डला इशारा करतो आणि पळत जातो. त्याच्या पाठोपाठ त्याचा बॉडीगार्डही जातो. हा सगळं प्रकार नेमका काय आहे हे असा प्रश्न अनेक नेटकरी विचारत आहेत. यासोबतच आणखी एका व्हिडिओमध्ये निकच्या डोक्यावर एक लेझर लाइट दिसतेय. ही लेझर कधी त्याच्या डोक्यावर तर कधी त्याच्या शरीरावर पडताना दिसते. जशी निकला ही लेझर दिसते निक पुढच्या क्षणी स्टेज सोडून पळतो. जेव्हा निक पळतो तेव्हा हीच लेझर जमिनीवर देखील दिसते. अशा लेझर बंदुकीतून एखाद्यावर निशाणा लावल्यावरही दिसतात. त्यामुळे निक लेझर पाहून निघून गेला.

या घटनेमुळे जोनास ब्रदर्सना आपला शो थांबवावा लागला होता. मात्र काही वेळानंतर त्यांनी पुन्हा आपला कार्यक्रम सुरू केला. आता नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, 'हे खूप भयानक आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'त्याने असं करायची हिम्मतच कशी केली. हे भीतीदायक आहे.' दुसऱ्याने लिहिलं, 'गायक इतका अलर्ट होता हे पाहून खूप बरं वाटलं.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगर पंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग; फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार मुदत; प्रभाग रचनेचा कार्यक्रम लागणार?

IND vs SL Test: भारतीय संघ ९ वर्षांनी श्रीलंकेत कसोटी खेळणार! कधी होणार सामने? तारखेबाबत मोठी अपडेट

Pune Crime : खराडीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; पतीसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

Municipal School : महापालिकेच्या पाच शाळांचे खासगीकरण; नऊ वर्षांत मोजणार १०१ कोटी रुपये

Pune Road Crash: मुंढव्यात भरधाव डंपरची दुचाकीला धडक; २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, चालक फरार

SCROLL FOR NEXT