nirmiti sawant  sakal
Premier

Nirmiti Sawant: असावं माणसाने झिरो फिगर पण मी... लठ्ठपणावर निर्मिती सावंत यांचं सडेतोड मत, म्हणतात-

Nirmiti Sawant On Zero Figure: लोकप्रिय मराठी अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचं झिरो फिगरबद्दलचं मत व्यक्त केलं आहे.

Payal Naik

मराठमोळ्या अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टी आणि रंगमंच दोन्ही गाजवलं. त्या कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आल्या. त्यांनी 'गंगुबाई नॉनमॅट्रिक' मधून घराघरात ओळख मिळवली. तर चित्रपटांनी त्यांना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून दिलं. 'खबरदार' चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. सध्या त्या 'व्हॅक्युम क्लिनर' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या नाटकात त्या अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत दिसत आहेत. अशात आता त्यांनी नुकतीच दिलेली मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

सिनेसृष्टीत काम करायचं म्हणजे तुम्ही एका विशेष पठडीत बसलं पाहिजे असं अनेकांना वाटतं. तुमच्या शरीराला विशिष्ट फिगर हवी. गेल्या काही वर्षात झिरो फिगर ही संकल्पना रुजली. तुम्ही तशा असाल तरच तुम्हाला भूमिका मिळतात असं अनेकांना वाटतं. मात्र निर्मिती यांनी ही समजूत मोडीत काढली. तुमचा अभिनय चांगला असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे त्यांनी दाखवून दिलं. निर्मिती यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना झिरो फिगर बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना निर्मिती म्हणाल्या, 'असावं की अभिनेत्रींनी झिरो फिगर. माझं त्यावर काहीच म्हणणं नाही. मी नाहीये त्याला काय करणार.माझं असं काही म्हणणं नाहीये बाबा की नाहीये मी झिरो फिगर तरी मी दाखवतेच तुम्हाला, नाही.'

छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं

त्या पुढे म्हणाल्या, ' माझं प्रामाणिक म्हणणं आहे जे तुमच्या नशिबात लिहिलेलं असतं ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कमी मुलींनी प्रयत्न केले असतील का? ज्या जिरो फिगर नाहीयेत त्यांनी या फिल्डमध्ये येण्याचे? का नसेल मिळालं? कदाचित देवाने त्यांना तेवढं टॅलेंट नसेल दिलं. असेल काही प्रॉब्लेम असेल. मलाही वाटतं की छान फिगर असावी पण नाहीये. काय करू आता? मला असं वाटतं, त्यामुळे काही काहीही अडत नाहीये. मग चाललंय, चालूदे. वाटतं तर प्रत्येकाला. कुणाला नाही वाटत? कितीही टॅलेंटेड असलं तरी छान दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. मी छान दिसायचा प्रयत्न करते. झिरो फिगर नाहीये. ठीक आहे.'निर्मिती शेवटच्या 'झिम्मा २' या चित्रपटात दिसल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT