pandharichi wari  sakal
Premier

'पंढरीची वारी' चित्रपटातील ते कलाकार ज्यांना कधी वारी पावलीच नाही; कुणाचा अपघात तर कुणाला आजारपण, बालकलाकारसुद्धा...

Pandharichi Wari Movie Unknown Facts: 'पंढरीची वारी' या चित्रपटातील अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. त्यात हा चित्रपट तयार होण्यासही प्रचंड कालावधी लागला.

Payal Naik

प्रत्येक आषाढी एकादशीला प्रेक्षकांना ज्या चित्रपटाची आवर्जून आठवण येते तो चित्रपट म्हणजे 'पंढरीची वारी'. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष उलटली तरी या चित्रपटाची जादू मुळीच कमी झालेली नाही. प्रेक्षक मोठ्या आवडीने हा चित्रपट पाहतात. कोणत्याही चॅनेलवर हा चित्रपट लागला तरी प्रेक्षक टीव्हीसमोर ठाण मांडून बसतात. मात्र या चित्रपटातील काही कलाकारांना या चित्रपटाचा अर्ध्यातूनच निरोप घ्यावा लागला होता. चित्रपटातील मुख्य कलाकारांपैकी अनेकांनी या जगाचा निरोप घेतलाय.

pandharichi wari

'पंढरीची वारी' हा चित्रपट आधी अभिनेत्री रंजना आणि अभिनेते अरुण सरनाईक यांना घेऊन बनवण्यात येत होता. या चित्रपटाचं तब्बल ७० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. मात्र या चित्रपटाच्या शूटिंग वरून परतत असताना रंजना आणि अरुण सरनाईक यांच्या गाडीचा फार मोठा अपघात झाला. या अपघातात अरुण सरनाईक यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली. तर रंजना यांना कायमचं अपंगत्व आलं. त्यानंतर निर्मात्यांनी रंजना यांच्या बरं होण्याची फार वाट पाहिली. मात्र शेवटपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकल्या नाहीत. शेवटी त्यांची परवानगी घेऊन निर्मात्यांनी त्यांच्या जागी जयश्री गडकर आणि बाळ धुरी यांना कास्ट केलं.

pandharichi wari

पुढे चित्रपट पूर्ण झाल्यानंतर या चित्रपटाने सगळ्यांची मनं जिंकली. मात्र पुढे शिक्षण सुरू असताना या चित्रपटातील बालकलाकाराचा मृत्यू झाला. या चित्रपटात विठोबाची भूमिका बालकलाकार बकुल कवठेकर याने साकारली होती. त्याने एक वाक्यही न बोलता आपल्या हावभावांनी सगळ्यांवर छाप पाडली. चित्रपटानंतर त्याने पुण्यातफाईन आर्टसचं शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला. परंतु, २००२ मध्ये त्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ही बातमीदेखील सगळ्यांना चटका लावून गेली. या चित्रपटातील बहुतांश कलाकारांचं आता निधन झालं आहे.

pandharichi wari

या चित्रपटातील जयश्री गडकर, राजा गोसावी, आशा पाटील, दीनानाथ तकलकर, अनुप जलोटा यांचं निधन झालं आहे. तर चित्रपटाच्या कलाकारांपैकी बाळ धुरी, अशोक सराफ, नंदिनी जोग केवळ या जगात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अक्षय तृतीयानिमित्त आज भेंडवळची घटमांडणी; साडेतीनशे वर्षापासून पीक पाण्याचा अंदाज व भाकीत वर्तवणारी परंपरा काय?

Engineer End life Ichalkaranji : कामाचे पैसे न दिल्याने अभियंत्याने स्वत:च्या केबीनमध्ये उचललं टोकाचं पाऊल, 'त्या' चिट्टीत नेमकं काय?

Video: मंत्री बावनकुळेंची लव्ह स्टोरी! अल्पवयीन मुलीला पळवलं, मग थेट जेलमध्ये रवानगी

IPL 2026: धडाकेबाज पंजाबचा सर्वांसमोर दरारा; लखनौ सुपर जायंट्‍ससमोर आज आव्हानांचा पाढा, पंतसमोर प्रश्नचिन्ह

Nagpur News: तापलेल्या रस्त्यावर जगण्यासाठी संघर्ष; सकाळी १० ते ५ विक्री मंद; उन्हामुळे भाजीपालाही होतो खराब

SCROLL FOR NEXT