Bigg Boss Marathi Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील 'ही' खलनायिकाही जाणार बिग बॉस मराठीच्या घरात ? काही दिवसांपूर्वीच घरफोडीच्या प्रकरणामुळे होती चर्चेत 

Bigg Boss Marathi Season 5 Update : बिग बॉस मराठी सीजन ५ मध्ये मराठी इंडस्ट्रीमधील एक आघाडीची अभिनेत्री जाणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bigg Boss Marathi Updates : कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच सुरु होणाऱ्या बिग बॉस मराठी सीजन ५ ची चर्चा सगळीकडेच सुरु आहे. यंदाच्या सीजनमध्ये कोणते सेलिब्रिटीज स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार याचीही चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. यातच आता आणखी एका अभिनेत्रीचं नाव पुढे आलं आहे. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.

छोट्या पडद्यावरील गाजलेली खलनायिका

मराठी मालिकांमधील गाजलेली खलनायिका आणि नृत्यांगना अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठी सीजन ५ च्या घरात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉस मराठी सीजन ५ चे अपडेट्स देणाऱ्या काही सोशल मीडिया पेजनी ही बातमी शेअर केली. बिग बॉस मराठी सीजन _५ या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलं कि, जान्हवी या घरात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल्याचं म्हंटलं आहे.

जान्हवी किल्लेकरने तिच्या करिअरची सुरुवात नृत्यांगना म्हणून केली. अनेक आयटम सॉन्ग मध्ये तिने डान्स केला. त्यानंतर तिने मालिकेत काम करायला सुरुवात केली. कोळीवाडा झिंगला हे तिचं गाणं खूप गाजलं होतं तर आई माझी काळूबाई या मालिकेतून तिने अभिनयाविश्वात पदार्पण केलं. यातही तिने मालती ही निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटीस आली 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत. पण तिला ओळख मिळाली ती 'भाग्य दिले तू मला' या मालिकेमुळे. या मालिकेत ती साकारत असलेली सानिया ही भूमिकाही खूप गाजली.

जान्हवी बरोबरच अभिनेता विवेक सांगळे आणि चेतन वढनेरे हे कलाकार बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार असल्याचं म्हंटलं जातंय. याबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर ही सुद्धा सहभागी होणार असल्याचं म्हंटलं जातंय.

२८ जुलै २०२४ ला बिग बॉस मराठी सीजन ५ चा प्रीमियर पार पडणार आहे. यंदा अभिनेता रितेश देशमुख या सीजनचं सूत्रसंचालन करणार आहे. दररोज रात्री ९:३० वाजता कलर्स मराठी आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा नवा सीजन पाहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT