Sanskruti Balgude sakal
Premier

Sanskruti Balgude: कौतुकास्पद! कॅन्सर पेशंटला केस दान करणार संस्कृती बालगुडे; मराठी अभिनेत्रीच्या निर्णयाचं होतंय कौतुक

Sanskruti Balgude New Hairstyle: अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने कॅन्सर असलेल्या रुग्णांना आपले केस दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Payal Naik

वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा फॅशनमधला वेगळेपणा, मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या फॅशन आणि उत्तम अभिनयासाठी कायम चर्चेत असते. सध्या तिचा नवा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होतोय. तिने या नव्या लूकची खास गोष्ट शेयर केली आहे. संस्कृती नेहमीच तिच्या कामात किंवा फॅशनमध्ये प्रयोग करताना दिसते. आता तिने तिच्या नव्या लूकसाठी आयुष्यात पहिल्यांदा एवढे छोटे केस केले असून ती हे केस कॅन्सर पेशंट ना दान करणार आहे.

याबद्दल बोलताना संस्कृती म्हणते, 'नव्या भूमिकेसाठी नवा हेअर कट करणं खरंतर ही खूप धाकधूक होती. मनात कुठेतरी होत की आपल्याला हे झेपणार आहे का मी पहिल्यांदा एवढे शॉर्ट कट केले आहेत. तो जेव्हा झाला तेव्हा वाटलं की नाही हे छान झालं मग टीमसोबत चर्चा करून अस ठरलं की यावर एक फोटो शूट करूया कारण ती एक आठवण राहणार आहे. हे खास फोटो शूट तेजस नेरुरकर ने केलं आहे. आपण किती वेगळं दिसू शकतो आणि खूप गोष्टी एक्सप्लोर करून हे फोटो शूट केलं आहे. शॉर्ट हेअर खरंच सांभाळण्यासाठी किती सोप्प आहे हे समजलं पण जेव्हा केव्हा आम्ही यात फोटो शूट करतोय तेव्हा अनेक प्रयोग करून ते करतोय जेणेकरून मला मी किती वेगळी दिसतेय याचा सुद्धा आनंद यातून अनुभवयाला मिळतोय.'

ती पुढे म्हणाली, 'खरं सांगायचं तर माझ्या डोक्यात नव्हत की कॅन्सर पेशंट ला केस दान करावे केस कापण्याचा दोन तीन दिवस आधी मी इंस्टाग्राम स्क्रोल करत होते आणि तेव्हा मी बघितलं काही मुली त्यांचे केस कापून उरलेलं केस हे दान करत होत्या यातून हा विचार आला आणि मग हा निर्णय घेतला की आपण आपले केस कॅन्सर पेशंट ला दान करावे अगदी ते थोडे असतील पण ते दान करून यातून काहीतरी घडू शकत म्हणून मी माझे केस दान केले.'

संस्कृती म्हणाली, 'येणारा आगामी प्रोजेक्ट नक्कीच उत्कठावर्धक आहे आणि नुकतच आम्ही त्याच शूट पूर्ण केलं आहे बरीच स्टार कास्ट आहे आणि यातून काहीतरी वेगळेपण तुम्हाला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा अनुभवता येणार आहे यात शंका नाही. नव्या भूमिकेसाठी हा नवा लूक तर आहे पण फिल्म खूप उत्तम लिहिली गेली माझ्या सगळ्या सहकलाकारांनी मस्त काम केलं आता ती कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची मला सुद्धा उत्सुकता आहे.' अभिनयाच्या पलिकडे जाऊन अश्या गोष्टी समाजासाठी करण हा मोठा निर्णय तर नक्कीच आहे. संस्कृती च्या नव्या लूक सोबत प्रेक्षक तिच्या या निर्णयाच देखील तितकंच कौतुक करताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT