Bhushan Patil Bollywood Debut SAKAL
Premier

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" फेम अभिनेता भूषण पाटील करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे पण..."

Bhushan Patil Bollywood Debut: भूषणने नुकतच त्याचा हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरू केल आहे.

priyanka kulkarni

Bhushan Patil: "शिवरायांचा छावा" (Shivrayancha Chhava) या सिनेमात अभिनेता भूषण पाटीलने (Bhushan Patil) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटामुळे भूषणला विशेष लोकप्रियता मिळाली. आता भूषण पाटील एका हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. भूषणने नुकतच त्याचा हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरू केल आहे.

भूषण नव्या प्रोजेक्ट बद्दल बोलताना म्हणातो, "आजवर मराठी सिनेमात अनेक भूमिका साकारल्या आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम देखील दिलं हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करण हे माझ्यासाठी देखील आव्हानात्मक आहे. पहिली हिंदी फिल्म आणि त्यात सुद्धा मुख्य भूमिका साकारायला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. हिंदी चित्रपट विश्वात काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे पण तेवढीच धाकधूक सुद्धा आहे पण प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणं हा एकच हेतू आहे आणि म्हणून हिंदी प्रेक्षकांना सुद्धा मी आपलंसं करून घेईन ही आशा आहे. आज चित्रपटाच्या शूट चा पहिला दिवस आहे आणि तुमचं प्रेम कायम असच सोबत राहू दे"

आजवर भूषण ने अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत आणि कायम चर्चेत राहिला आहे. अभिनयातून त्याने कायम प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आणि आता तो हिंदी प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. चोख अभिनय कौशल्य असलेला भूषण फिटनेस फ्रिक सुद्धा आहे हे त्याचा सोशल मीडिया वरून कळतच.

आता भूषण नक्की कोणता हिंदी चित्रपट करतोय? या चित्रपटाच नाव काय ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळतील. हिंदी मधल भूषणच पदार्पण नक्कीच खास ठरणार आहे यात शंका नाही.

मराठी प्रेक्षकांना मोहित करणारा अभिनेता म्हणून भूषणची ओळख आहे पण आता तो हिंदीत देखील स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होत आहे. अद्याप चित्रपटाचं नाव समजलं नसल तरी लवकरच हा हिंदी चित्रपट काय असणार आहे समजणार आहे सोबतीला भूषण या चित्रपटात मुख्यभूमिका साकारणार आहे त्यामुळे सगळ्यांचं प्रेक्षकांना याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT