bigg boss ott 3 sakal
Premier

Bigg Boss OTT 3: अरमान- कृतिकाच्या 'त्या' व्हिडिओवरून राजकारण तापलं; निर्मात्यांविरोधात कारवाईची मागणी

MLA Asked Action On Bigg Boss Ott 3: 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये दाखवण्यात आलेल्या अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांच्या त्या व्हिडीओमुळे सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे.

Payal Naik

छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय असणारा बिग बॉस हा कार्यक्रम घराघरात पाहिला जातो. मोठेच नाही तर किशोरवयीन मुलंदेखील या कार्यक्रमाचे चाहते आहेत. महिन्याभरापूर्वी 'बिग बॉस ओटीटी ३' हा कार्यक्रम ओटीटीवर सुरू झाला आहे. याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो आहे. मात्र त्यात दाखवण्यात आलेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या व्हायरल व्हिडिओवरसोशल मीडियावर टीकाही करण्यात आली होती. यात घरातील सदस्य अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिक यांचे अश्लील चाळे दाखवण्यात आले होते. आता या विरोधात शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे या आक्रमक झाल्या आहेत.

bigg boss ott 3

'बिग बॉस ओटीटी ३' हा कार्यक्रम बंद करून या कार्यक्रमाच्या निर्मात्यांविरोधात कारवाई करत त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पोलीस आयुक्तांना दिलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं, 'मा. महोदय, मागील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेल्या बिगबॉस सीजन ३ या रियालिटी शोचे प्रक्षेपण २१ जून पासून सुरू झाले आहे. दररोज रात्री ९ वाजता ओटीटी वर त्याचे प्रसारण होत आहे. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो कुटुंबीय सदर शो पाहत असतात. मात्र काल दि. १८ जुलै २०२४ रोजी रात्री प्रसारित करण्यात आलेल्या शोमध्ये कलाकार कॅमेरासमोर अतिशय बिभत्स / किळसवाणे कृत्य करताना दाखवण्यात येत होते.'

पुढे त्यांनी लिहिलंय, 'सदर शोच्या दरम्यान आरमान मलिक व कृतिका मलिक या कलाकारांनी कौटुंबिक नात्यांच्या सर्व सीमा पार करत व समाजिक मूल्यांची वाट लावत शरमेने मान खाली जाईल असे कृत्य केले आहे. सदर प्रकार अत्यंत दुर्दैवी असून अश्या प्रकारे चित्रीकरण व प्रक्षेपण करणाऱ्या सर्व संबंधितांनावर तातडीने योग्य कलमान्वये कारवाई व्हावी व सदर किळसवाणा शो बंद व्हावा याकरिता अनेकांनी आवाज उठवला आहे. तरी, बिगबॉस सीजन ३ सारख्या वादग्रस्त रियालिटी शोबाबत निर्माते, कलाकार व प्रक्षेपक यांच्यावर कारवाई करण्यात यावी.'

यासोबतच मनीषा यांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांना तुम्ही हे जे करत आहात ते योग्य आहे का असा प्रश्नही विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Temple Incident : जेजुरी गडावर धक्कादायक घटना! भाविकांकडून पुजाऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशास सुरवात; राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत शिक्षणाची संधी; १२ जूनपर्यंत करता येणार अर्ज

एकेकाळी प्रफुल पटेलांचे PA ते आता राज्यसभेसाठी पक्षाकडून उमेदवारी, कोण आहेत राजेंद्र जैन?

Petrol-Diesel-CNG Price: LPG गॅस दरवाढीनंतर आज पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर! आता किती रुपये मोजावे लागणार?

Rahul Gandhi: मोदींना वाटते, युवकांनी भजी तळावीत: राहुल गांधी, सीबीएसई घोटाळा प्रकरण तापले

SCROLL FOR NEXT