Dhoom 4 Sakal
Premier

Dhoom 4 : ‘धूम ४’मध्ये श्रद्धाची एन्ट्री?

Ranbir Kapoor : यशराज बॅनरची धूम ही फ्रॅंचायझी यशस्वी ठरलेली आहे. आतापर्यंत त्याचे तीन भाग आले आणि ते यशस्वीही झाले आहेत आता चर्चा सुरू आहे ती ‘धूम ४’ या नव्या भागाची या भागामध्ये अभिनेता रणबीर कपूर सहभागी होणार हे आधीच जाहीर करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

यशराज बॅनरची धूम ही फ्रॅंचायझी यशस्वी ठरलेली आहे. आतापर्यंत त्याचे तीन भाग आले आणि ते यशस्वीही झाले आहेत. आता चर्चा सुरू आहे ती ‘धूम ४’ या नव्या भागाची. या भागामध्ये अभिनेता रणबीर कपूर सहभागी होणार, हे आधीच जाहीर करण्यात आले आहे आणि त्याचबरोबर आता श्रद्धा कपूरही या चौथ्या भागात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सूत्रांचा असा दावा आहे की, आदित्य चोप्राने रणबीर कपूरला ‘धूम’ फ्रँचायझी चित्रपटात कास्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याला ही फ्रँचायझी रीबूट करायची आहे. ‘ॲनिमल’च्या सुपर सक्सेसनंतर ‘धूम ४’मध्ये रणबीर कपूरची एन्ट्री उत्सुकता वाढवणारी आहे. आता यात श्रद्धा कपूर रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ही बातमी समजताच सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर ही जोडी ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटात दिसली होती.

या चित्रपटात त्यांची जोडी प्रेक्षकांना भावली. आता पुन्हा एकदा रणबीर कपूरसोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप ही बातमी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, रणबीर कपूरच्या मिठीत असून कॅप्शनमध्ये ‘धूम ४’ असे लिहिले आहे. जेव्हापासून चाहत्यांनी ही पोस्ट पाहिली आहे, तेव्हापासून प्रत्येक जण म्हणत आहे की ‘धूम ४’ हा चित्रपटही ‘तू झुठी मैं मक्कार’सारखा सुपरहिट ठरेल.

ही ॲक्शन सीरिज सध्या प्री-प्रॉडक्शन स्टेजमध्ये आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. धूमच्या चौथ्या फ्रँचायझीचे शीर्षक ‘धूम रीलोडेड’ असेल, असेही सांगितले जात आहे; परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शूटिंगबद्दल बोलायचे झाले, तर ‘धूम ४’चे शूटिंग २०२५च्या शेवटी किंवा २०२६च्या सुरुवातीला सुरू होणार असल्याचे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT