baba siddique bollywood  esakal
Premier

सलमान- शाहरुखचं भांडण मिटवणाऱ्या बाबा सिद्दीकींचं बॉलिवूडशी नेमकं कनेक्शन काय? सुनील दत्त ठरलेले कारण

Baba Siddiqui Bollywood Connection: लोकप्रिय राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांचं बॉलिवूडशी नेमकं काय कनेक्शन होतं हे अनेकांना ठाऊक नाही.

Payal Naik

काँग्रेसचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांनंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. त्यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याघटनेनंतर त्यांना पाहण्यासाठी अर्ध बॉलिवूड लोटलं होतं. सलमान खानपासून ते संजय दत्त पर्यंत अनेक कलाकार त्यांच्या दर्शनासाठी पोहोचले होते. मात्र नेते म्हणून कारकीर्द गाजवणाऱ्या बाबा सिद्धीकी यांचा बॉलिवूडशी नेमका संबंध काय?

सुनील दत्त यांच्याशी मैत्री

बाबा सिद्दीकी दरवर्षी बॉलिवूड वर्तुळात गाजतात ते त्यांच्या इफ्तार पार्टीमुळे. त्यांच्या इफ्तार पार्टीला संपूर्ण बॉलिवूड झाडून हजेरी लावतं. याच इफ्तार पार्टीत बाबा सिद्दीकी यांच्यामुळे सलमान खान आणि शाहरुख खान यांचं कित्येक वर्षांचं भांडण मिटलं होतं. कतरिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सलमान आणि शाहरुख यांचा वाद झाला होता. त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र २०१३ ला बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीत त्यांचा हा अबोला मिटवला होता. मात्र बाबा सिद्दीकी यांचा बॉलिवूडमधील मार्ग हा सुनील दत्त यांनी मोकळा करून दिला होता. ते अभिनेते सुनील दत्त होते ज्यांनी बाबा सिद्दीकी यांना १९९९ साली बांद्रा येथून आमदारकीचं तिकीट मिळवून देण्यास मदत केली होती. तेव्हा बाबा सिद्दीकी सलग तीनवेळा बांद्रा येथून आमदार म्हणून निवडून आले.

ते सुनील दत्तचं होते ज्यांनी सिद्दीकी यांची बॉलिवूडच्या झगमगत्या जगाशी ओळख करून दिली होती. संजय दत्त देखील त्यांच्याशी जोडला गेला. त्यानंतर त्यांनी सलमान खान, शाहरुख खान सगळ्याचं बड्या सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सला पार्टीसाठी आमंत्रण द्यायला सुरुवात केली. सुनील दत्त यांच्यामुळे सिद्दीकी यांच्या खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये एंट्री झाली असं म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT