dharmaveer 2 shrikant shinde  sakal
Premier

Dharmaveer 2: 'धर्मवीर २'मध्ये हा अभिनेता साकारतोय श्रीकांत शिंदेंची भूमिका; बिग बॉस मराठीमध्येही केलाय राडा

Shrikant Shinde In Dharmaveer: 'धर्मवीर २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील कलाकारांची माहीती समोर येत आहे.

Payal Naik

लोकप्रिय दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या लेखणीतुन उतरलेला 'धर्मवीर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात शिवसेना नेते आनंद दिघे यांचं आयुष्य दाखवण्यात येणार आहेत. 'धर्मवीर' या चित्रपटात अर्धवट राहिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं आता या चित्रपटात मिळणार आहेत असं सांगण्यात येतंय. त्यात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता मंगेश देसाई हा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर येतो आहे.

'धर्मवीर' मध्ये आनंद दिघे यांच्यासोबत सावलीसारखे असणारे एकनाथ शिंदे यांची भूमिका अभिनेता क्षितिज दाते याने साकारली होती. आताही तो याच भूमिकेत दिसणार आहे. मात्र भाग दोन मध्ये काही नवे चेहरेदेखील पाहायला मिळणार आहेत. यात महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांचं पात्रही पाहायला मिळणार आहे. आता चित्रपटात त्यांची भूमिका कोण साकारणार हे समोर आलं आहे. लोकप्रिय अभिनेता आरोह वेलणकर हा चित्रपटात श्रीकांत शिंदे यांची भूमिका साकारणार आहे. आरोह यापूर्वी 'बिग बॉस मराठी' मध्ये दिसला होता. या कार्यक्रमातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

त्यापूर्वी आरोहचा 'रेगे' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर तो काही मालिकांमध्येही दिसला. आता तो 'धर्मवीर २' मध्ये श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमधील अनेक डायलॉगदेखील सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

Crime News: पहिल्या पतीचं निधन, दुसऱ्यानं सोडलं; नंतर पत्नीनं तिसऱ्या नवऱ्याला जिवंत जाळून संपवलं, धक्कादायक कारण समोर

Vaibhav Sooryavanshi : वैभवने विश्वविक्रमानंतर 'A' अक्षर का दाखवले? जाणून घ्या सेलिब्रेशनमागची हृदयस्पर्शी गोष्ट

Pune Crime: पुण्यात पोलीस चौकीसमोरच तरुणावर झाडल्या गोळ्या, धक्कादायक घटनेने शहरात खळबळ; नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT