dada kondke sakal
Premier

Dada Kondke:भावामुळे थाटला संसार, पण चार वर्षही टिकला नाही; त्या काळी दादा कोंडकेंनी किती दिलेली पोटगी? जाणून घ्या

Dada Kondke Wife: अनेकांना तर अजूनही दादा कोंडके हे विवाहीत होते हे देखील ठाऊक नाही.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेते दादा कोंडके म्हटलं की त्यांचे चित्रपट डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागतात. त्यांनी आपल्या अभिनयाने आणि लेखणीने प्रेक्षकांना हास्याची दुनिया दाखवली. त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात तब्बल ५० आठवडे चालायचे. त्यांच्या करिअरबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणालाही फारसं ठाऊक नाही. दादांचं लग्न झालं होतं हेदेखील अनेकांना ठाऊक नाही. त्यांच्या आत्मचरित्रात मात्र त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. त्यांचा संसार अवघ्या चार वर्षात मोडला होता. कोण होती त्यांची पत्नी?

दादांनी आपल्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात उल्लेख केल्याप्रमाणे, जसे दादा मोठे होते तसे ते आणखी वात्रट होत होते. त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाला त्यांच्या भविष्याची काळजी वाटू लागली. त्यांनी दादांचं लग्न करायचं ठरवलं. लग्नासाठी दादा तयार नव्हते. जेव्हा दादांना मुंबईत गिरणी कामगारम्हणून नोकरी मिळाली तेव्हा त्यांच्या भावाने त्यांच्यापाठी लग्नाचा तगादा लावला. दादांसाठी नलिनी नावाच्या मुलीचं स्थळ आलं. नलिनी गरीब घरातील होती त्यामुळे त्यांच्या मुलांकडून फार अपेक्षा नव्हत्या. तर दादाही दिसायला बरे असल्याने त्यांनाही मुलीकडून फार अपेक्षा नव्हत्या. परंतु नोकरी बेताची असल्याने नलीनीने त्यांना होकार दिला.

१९६४ मध्ये दादांचं लग्न झालं. सुरुवातीला त्यांनी पत्नीला दादा आणि वहिनीसोबत इंगवली येथे ठेवलं. नंतर त्यांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य तुफान चालू लागलं. त्याचे चांगले पैसे येऊ लागले. त्यानंतर दादांनी परेल येथे स्वतःचं घर घेतलं. आणि नलीनीलादेखील मुंबईला आणलं. मात्र नाटकाच्या दौऱ्यांमुळे त्यांचं संसाराकडे दुर्लक्ष झालं. मध्यंतरी त्यांच्या मध्ये काहीतरी बिनसलं ज्याचा आत्मचरित्रात उल्लेख करणं दादांनी टाळलं. मात्र पुढे त्यांचं नातं पूर्वीसारखं कधीही झालं नाही. शेवटी १९६८मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र या घटस्फोटासाठी दादांना नलिनीला त्याकाळी तब्बल ४० हजारांची पोटगी द्यावी लागली होती. त्यांच्या संपत्तीवर त्यांच्या पश्चात मुलीनेदेखील हक्क सांगितला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

IND vs SL 2nd Test: ठणठणीत खेळपट्टी गोलंदाजांना सतावणार; भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून

Third Mumbai: 'तिसरी मुंबई' साठी भूसंपादनाला वेग! ५५० एकर जमीन अन् चार हजार कोटी रुपयांचा खर्च

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

SCROLL FOR NEXT