Corona Patients Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात आज नवीन १०० कोरोना रुग्ण; एकूण १ हजार ६९० सक्रिय

पुणे जिल्ह्यात बुधवार (ता.८) अखेरपर्यंत १ हजार ६९० सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी केवळ ५८० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात बुधवार (ता.८) अखेरपर्यंत १ हजार ६९० सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांपैकी केवळ ५८० रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ११० रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात २३३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १०० नवीन रुग्णांचा समावेश आहे. दोन आठवड्यांच्या खंडानंतर बुधवारी पहिल्यांदाच शहरात दिवसात १०० रुग्ण सापडले आहेत.

पुणे शहरात याआधी २३ नोव्हेबर २०२१ ला एका दिवसात १०० नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. दरम्यान, दिवसभरात २१० जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १०० रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ५४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६६, नगरपालिका हद्दीतील नऊ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात पुणे शहरातील सर्वाधिक ९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पिंपरी चिंचवडमधील ५८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३८, नगरपालिका हद्दीतील १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन जणांचा समावेश आहे. सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील २७३ जण आहेत. दिवसभरात अन्य दोन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहेत.

पुणे शहरात दोन आठवड्यानंतर बुधवारी पुन्हा दिवसातील नवीन रुग्णांची संख्या १०० वर गेली आहे. परंतु चाचण्या वाढल्याने रुग्णांची संख्या वाढलेली दिसते आहे. प्रत्यक्षात पॉझीटिव्हीटी दर हा दोनच्या आतच आहे. त्यामुळे संख्या वाढलेली दिसत असली तरी पुणेकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT