Tuljaram Chaturchand College  esakal
पुणे

Baramati Murder : बारामती हादरली! १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोयत्याने महाविद्यालय परिसरात खून

Tuljaram Chaturchand College 12th Class Student Murder : बारामती येथील टीसी कॉलेजमध्ये एका बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला आहे

मिलींद संगई

बारामती, ता. 30 : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

सोमवारी (ता. 30) सकाळी अकराच्या सुमारास एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सदर विद्यार्थी जखमी झाला होता, त्यानंतर त्याला दवाखान्यात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

या घटनेनंतर महाविद्यालयाच्या आवारात तातडीने पोलीस पोचले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याबरोबर आणखीन एक युवक यात सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

यामध्ये दोन्ही अल्पवयीन मुले असून ज्या विद्यार्थ्यांचा खून झाला तो देखील अल्पवयीन असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले.

एक महिन्यापूर्वी पार्किंग मध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा मनात राग ठेवून हा हल्ला केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

यासंदर्भात पोलिसांनी संबंधित युवकांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

Mumbai: १० वर्षीय मुलीनं १८ महिन्यांच्या बाळाला इमारतीवरून खाली फेकलं, गोरेगावात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Bank Holiday: 15 ते 31 ऑक्टोबरदरम्यान बँकांना 12 दिवस सुट्ट्या! महाराष्ट्रात कधी बंद राहणार बँका? पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Update : जुन्नर तालुक्यात खरीप पिकांचे पंचनामे आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT