पुणे

पुण्यात यायचंय? क्वारंटाईनसंदर्भात आहे महत्त्वाची बातमी!

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विविध खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी लॉकडाऊन लागू करून कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच होम क्वारंटाईनचा वापर करण्यात येत आहे. त्याचसंदर्भात ही महत्त्वाची बातमी आहे. ज्या प्रवाशाला पुण्यात प्रवास करायचा असल्यास त्याला 14 दिवसांचा होम क्वारंटाईन बंधनकारक होते. मात्र, आता याबाबत आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जर कोणत्याही कामानिमित्त जिल्ह्यात प्रवेश करायचा असल्यास 14 दिवसांचा होम क्वारंटाईन बंधनकारक होता. मात्र, आता पुणे प्रशासनाने 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा निर्णय मागे घेतला आहे. जो कोणी पुण्यात कामानिमित्त किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला पोहोचविण्यासाठी किंवा नेण्यासाठी येत असेल तर अशा व्यक्तींना दोन आठवड्यांच्या होम क्वारंटाईनमधून सूट दिली जाऊ शकते. जेव्हा त्यांचे काम संपेल ते आपल्या गावी किंवा कार्यालयात क्वारंटाईन न होताच परत जाऊ शकतात. 

कोणाला होऊ शकतो याचा फायदा?

पुणे प्रशासनाच्या या निर्णयाचा फायदा हा फक्त प्रवाशांना होणार आहे. परंतु संबंधित प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नसावीत. जे कोणी कमी कालावधीसाठी पुण्यामध्ये येऊ इच्छित आहेत, अशा लोकांना याचा फायदा होणार आहे. 

तपासणीसाठी पथक तैनात

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुणे रेल्वे स्थानक आणि पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची टीम तैनात आहे. जर संबंधित प्रवाशामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आली तर संबंधिताला तातडीने होम क्वारंटाईन केले जाणार आहे. 

याबाबत जिल्हाधिकारी म्हणतात...

रेल्वे किंवा विमानमार्गे येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक काळ होम क्वारंटाईन व्हावे लागणार नाही. एका शहरातून दुसऱ्या शहरात कामानिमित्त लोकांची ये-जा होत आहे. त्यामुळे ते क्वारंटाईनमुळे आणखी काही दिवस तसेच राहू शकत नाहीत. परंतु, प्रवाशांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली तरी संबंधितांना क्वारंटाईन केले जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT