corona 
पुणे

मुळशीत उच्चांकी रुग्ण, या गावांनी घेतलाय महत्त्वाचा निर्णय   

राजेंद्र मारणे

भुकूम (पुणे) : मुळशी तालुक्यात आज एक दिवसात कोरोनाचे 14 रुग्ण सापडले असून, त्यामध्ये नऊ पुरुष व पाच महिलांचा  समावेश आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या 112 झाली आहे. दरम्यान, भुकूम व घोटावडे गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवून आठ दिवसांचा गाव बंदचा निर्णय घेतला आहे. 

मुळशी तालुक्यातील आज हिंजवडी 5, घोटावडे 1, माण 1, उरवडे 2, माले 1, मारुंजी 1, भरे 2 या गावांमध्ये रूग्ण सापडले, अशी माहिती तालुका आरेग्य आधिकारी डाॅ. अजित कारंजकर यांनी दिली. आजपर्यंत तालुक्यात एकही रुग्ण  दगावला नाही. आंदगाव येथील रुग्ण बरा झाला असून, आज त्यास घरी सोडण्यात आले. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मुळशी तालुक्यातील घोटावडे गाव मोठे असून, माण व हिंजवडीच्या शिवेवर आहे. दरम्यान आतापर्यंत तेथे रुग्ण सापडला नव्हता. गावठाणातील स्थानिक तरुण येथील एका कंपनीत कामास जात होता. त्याला करोना झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने अत्यावश्यक सेवा सुरू ठेऊन बाकी व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तालुक्यात भूगाव येथे आतापर्यंत सर्वात ज्यास्त 17 रूग्ण सापडल्याने गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. भुकूम गाव भूगावच्या शिवेवर आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांनीही गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT