Corona Patients Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात १,६५३ नवे कोरोना रुग्ण; १३ जणांचा मृत्यू

पुणे जिल्ह्यात गुरूवारी (ता.१०) दिवसभरात एक हजार ६५३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट दिवसभरात ४ हजार १२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात गुरूवारी (ता.१०) दिवसभरात एक हजार ६५३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याऊलट दिवसभरात ४ हजार १२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) गुरूवारी (ता.१०) दिवसभरात एक हजार ६५३ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. याऊलट दिवसभरात ४ हजार १२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १३ जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. दिवसभरातील जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील सात, पिंपरी चिंचवडमधील पाच आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक मृत्यू आहे. नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दिवसात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ६६८ रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये ४०२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २९४, नगरपालिका हद्दीत ५३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार १४१ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १ हजार ७९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७१०, नगरपालिका हद्दीतील १६१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ३८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या गुरूवारी १७ हजार ३४३ झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून १ हजार ३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १६ हजार ३९ जण गृह विलगीकरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाज वाटत नाही का? खासदार निधी खर्च होत नसल्यानं कंगना रनौत संतापल्या; म्हणाल्या, निगेटिव्ह प्रचार होतोय, रील्स बनतायत

…म्हणून मुक्ता बर्वेने हिंदीत फार काम केलं नाही, कारण सांगत अभिनेत्री म्हणाली...'ऑडिशन देत असते पण...'

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

Marathi News Live Updates : लाखोंच्या अनुदानात अपहार, महिला तलाठ्याला अटक

Duleep Trophy Final : वैभव सूर्यवंशीने भारताच्या 'Best' गोलंदाजाला झोडले; ४,६,४ असे सुरेख फटके खेचले, पाहात रहावा असा Video

SCROLL FOR NEXT