Police Mitra Sanghatana Sakal
पुणे

Mumbai Attack : मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील पोलिस, जवानांचा लढा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, जवानांनी मोठा लढा दिला, स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, जवानांनी मोठा लढा दिला, स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले.

पुणे - मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, जवानांनी मोठा लढा दिला, स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी शालेय पाठ्यपुस्तकात या घटनेचा समावेश करावा, अशी मागणी पोलिस मित्र संघटनेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली.

पोलिस मित्र संघटनेच्यावतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी, 'एनएसजी' जवान व नागरिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, संदीप खर्डेकर, अरुण जाधव उपस्थित होते. पाटील यांच्यासह परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीप सिंग गिल, डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे, दामिनी पुथकातील पोलिस कर्मचारी यांनी यावेळी शहिदांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संघटनेच्यावतीने यावेळी पुणे पोलिस दलास रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

कपोते म्हणाले, 'मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील वीर पुरुषांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी या घटनेचा धडा आपल्या शालेय पाठ्यपुस्तकात यावा त्यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल किती राज्य सरकारकडे मागणी आहे. तीच खरी श्रद्धांजली ठरेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT