Murder Crime Sakal
पुणे

पुणे : भिडे पुलाजवळ ३५ वर्षीय व्यक्तीचा खून, नदी पात्रात आढळला मृतदेह

लॉन्ड्री व्यावसायिक तरुणाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डेक्कन येथील नदीपात्रामध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

सकाळ डिजिटल टीम

लॉन्ड्री व्यावसायिक तरुणाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डेक्कन येथील नदीपात्रामध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

पुणे - लॉन्ड्री व्यावसायिक तरुणाचा खुन करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह डेक्कन येथील नदीपात्रामध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सुरेश कदम (वय 35, रा. शनिवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास डेक्कन येथील नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.त्यावेळी एका तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्याचा खुन झाला असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रांवरुन मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर संबंधित तरुण हा लॉन्ड्री व्यावसायिक असल्याची तसेच त्याची शनिवार पेठेत लॉन्ड्रीचे दुकान असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, रविवारी सायंकाळी सात वाजता कदम हे घराबाहेर पडले होते, तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते, मात्र ते त्यांना सापडले नाहीत. दरम्यान, सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजता एका सर्व्हिस सेंटर चालकाने नदीपात्रात मृतदेह पडला असल्याची खबर पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर घटनास्थळी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. या प्रकरणाचा तपास डेक्कन पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

SCROLL FOR NEXT