Pune Crime News  
पुणे

वैशाली हॉटेलच्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करुन घेतले ५ कोटींचे कर्ज; बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Pune Crime News

वैशाली हॉटेलच्या मालकिणीची बनावट स्वाक्षरी करुन सदनिकेवर पाच कोटी रुपयांचे तारण कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वैशाली हॉटेलच्या मालकिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह बँक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पती विश्वजीत विनायक जाधव (वय ४१) यांच्यासह कोटक महिंद्रा बँकेच्या येरवडा शाखेचे व्यवस्थापक राजेश देवचंद्र चौधरी, डीएसए आर. आर. फायनान्सचे रवी परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता आणि त्यांचे पती विश्वजीत यांच्यात वैशाली हॉटेलच्या मालकीवरुन वाद सुरू आहेत. याबाबत दोघांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. निकिता यांना विश्वासात न घेता पती विश्वजीत यांनी बँक अधिकाऱ्यांची भेट घेतली. निकिता यांची बनावट स्वाक्षरी करुन बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. (Latest Pune News)

निकिता यांच्या परवानगीशिवाय सदनिका बँकेकडे तारण ठेवून चार कोटी ९७ लाख रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे निकिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. निकिता यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Coach : इंग्लंड कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर, अँडी फ्लॉवर RCB ची साथ सोडणार? मोठी अपडेट्स आली समोर

Satana News : 'एक रुपयात पीक विमा योजना' तात्काळ पूर्ववत सुरू करा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे संजय चव्हाण यांची आग्रही मागणी

Latest Marathi News Live Update : मी ठाकरेंना अमरावतीला येऊन एकत्र हनुमान चालीसा पठण करण्याचे निमंत्रण देते - नवनीत राणा

'प्रायव्हेट जेट' ऐकलं असेल पण संपूर्ण रेल्वे ट्रेन बुक करता येते! भारतीय रेल्वेची खास 'FTR' सुविधा...

Kasari Sonarmala Road: कासारीतील सोनारमळा रस्ता वर्षानुवर्षे दुरावस्थेत; ग्रामस्थांचा ‘रस्ता देता का’ असा आक्रोश

SCROLL FOR NEXT