Pune Fraud Case sakal
पुणे

Pune Fraud Case : गुंत‌वणुकीच्या आमिषाने ८६ लाखांची फसवणूक ; वित्तीय संस्थेच्या मालकासह तीन जणांवर गुन्हा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने काही गुंतवणूकदारांची एकूण ८६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेच्या मालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने काही गुंतवणूकदारांची एकूण ८६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेच्या मालकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एका गुंतवणूकदाराने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून इन्कोफिना कन्सल्टंट कंपनीचे मालक अमर बिरादार, चेतन मोरवाल, ज्ञानेश्वरी बिरादार (रा. बाणेर रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार डेक्कन जिमखाना परिसरात राहतात. त्यांनी इन्कोफिना कंपनीत आधी १५ लाख रुपये गुंतविले.

त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात तक्रारदारासह अन्य गुंतवणूकदारांचीही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नांद्रे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Sainik Takli MIDC controversy : आमदार यड्रावकरांनीच सैनिक टाकळी एमआयडीसीचा घाट घातला? शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलकांचे गंभीर आरोप; संभाजी भिडेंनी केलं नेतृत्व

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

SCROLL FOR NEXT