Crime sakal
पुणे

Pune Crime: धक्कादायक! वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्याने गळफास लावून केली आत्महत्या

याआधीही त्याने भीमा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणार्‍या विजय नांगरे (वय- 21 वर्षे, मु. पो. मोहा, ता. गंगाखेड, जि. परभणी) या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज घडली आहे. वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून घेतल्याचे सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास दिसून आले.

विजय हा मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. घटना कळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या संदर्भात विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय भापकर म्हणाले की हा विद्यार्थी गेले काही दिवस डिप्रेशनमध्ये होता. घटना सकाळी निर्दशनास आली असली तरी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पहाटेच्या सुमारास त्याने गळफास लावून घेतला असावा. याआधीही त्याने भीमा नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या पालकांना कळवण्यात आले आहे. अधिक तपास चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT