छायाचित्रे
१. पंडित भीमसेन जोशी
२. विराज जोशी
३. सकाळ लोगो
४. प्रायोजक लोगो
सोलापुरात ५ नोव्हेंबरला ‘अभंग अमृत’चा स्वराविष्कार
विराज जोशी उलगडणार आजोबा पंडित भीमसेनजींच्या अभंगस्वरांचा अमृतानुभव
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २२ : दिवाळीच्या मंगल पर्वावर अभंगांच्या स्वरांतून भक्तीचा नाद घुमणार असून, किराणा घराण्याच्या समृद्ध स्वरपरंपरेचा अनुभव सोलापूरकरांना घेता येणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या अजरामर अभंगांचा स्वरानुभव रसिकांना देण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे ‘अभंग अमृत दिवाळी पहाट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ५ नोव्हेंबरला हा कार्यक्रम सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक यश डेव्हलपर्स आणि सहप्रायोजक एसीएस हॉस्पिटल आहेत.
पंडित भीमसेन जोशी म्हणजे भारतीय अभिजात संगीतविश्वातील एक अढळ स्वरस्तंभ! त्यांच्या स्वरांनी अभंगांना केवळ गायकीचे वैभव दिले नाही, तर भक्तीचा भाव घराघरांत पोहोचवला. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारख्या गीतातून राष्ट्रीय एकात्मतेचा स्वर गुंजवणाऱ्या आणि ‘माझे माहेर पंढरी’सारख्या अभंगातून भक्तिरसाची अनुभूती देणाऱ्या भीमसेनजींची स्वरपरंपरा आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. हाच अनमोल वारसा त्यांचे चिरंजीव पंडित श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी समर्थपणे पुढे नेत आहेत.
अवघ्या सहाव्या वर्षी ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त गायनसेवा सादर करून विराज यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांच्या गायकीतून उलगडणारी स्वरांची समृद्धी आणि अभंगांतील भक्तिभाव रसिकांना भीमसेनजींच्या स्वरपरंपरेची आठवण करून देतो. त्यामुळेच दिवाळी पहाटच्या माध्यमातून सोलापूरकरांना अभिजात संगीत, भक्तिरस आणि सुरेल परंपरेचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.
चौकट...
भीमसेनजींच्या अजरामर अभंगांची स्वरमैफल
विराज यांना ‘भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी फेलोशिप’ आणि गानप्रभा डॉ. प्रभा अत्रे यांच्या हस्ते रोटरी क्लबचा ‘युवा टॅलेंट पुरस्कार’ मिळाला आहे. नुकताच त्यांचा अडीच महिन्यांचा अमेरिकेचाही दौरा यशस्वी ठरला आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील अभंग महोत्सवांतून आपल्या गायकीची छाप उमटवल्यानंतर आता ते सोलापूरच्या रसिकांसमोर येणार आहेत. ‘तीर्थ विठ्ठल’, ‘माझे माहेर पंढरी’ यासारख्या पंडित भीमसेनजींच्या अजरामर अभंगांतून विराज यांच्या स्वरांत भक्तिरसाची अनुभूती घेण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे.
चौकट...
नोंदणीसाठी येथे साधा संपर्क
दिवाळीनिमित्त सोलापूरकर रसिकांसाठी आयोजित या कार्यक्रमाच्या नोंदणी आणि अधिक माहितीसाठी सुदर्शन (९६०४९७०४६३), महेश (९६३७९३९३७३), संतोष (९७६६१०९५४१) यांच्याशी संपर्क साधावा.
चौकट...
कुठे, कधी अन् केव्हा?
- कुठे : हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर
- कधी : ५ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार)
- केव्हा : पहाटे ६.३० वाजता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.