Crime sakal
पुणे

हुंड्यासाठी सासू, नणंद, नव-याने पोटात, पाठीत लाथा घातल्याने विवाहितेचा गर्भपात

हुंड्यासाठी छळ करणा-या सासू, नणंद, नव-याने पोटात, पाठीत लाथा घातल्याने गर्भपात झाल्याची तक्रार बोरीपार्धी ( ता.दौंड ) येथील माहेर असलेल्या महिलेने यवत पोलिसात दिली आहे.

रमेश वत्रे

हुंड्यासाठी छळ करणा-या सासू, नणंद, नव-याने पोटात, पाठीत लाथा घातल्याने गर्भपात झाल्याची तक्रार बोरीपार्धी ( ता.दौंड ) येथील माहेर असलेल्या महिलेने यवत पोलिसात दिली आहे.

केडगाव - हुंड्यासाठी (Dowry) छळ करणा-या सासू, नणंद, नव-याने पोटात, पाठीत लाथा घातल्याने गर्भपात (Abortion) झाल्याची तक्रार (Complaint) बोरीपार्धी ( ता.दौंड ) येथील माहेर असलेल्या महिलेने (Women) यवत पोलिसात (Police) दिली आहे. यासंदर्भात पती व सास-यास अटक (Arrested) करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, साक्षी नीलेश सलगर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. साक्षी यांचे नीलेश मोहन सलगर ( रा. नंदनवन बंगला, आदर्शनगर, रोड नं २, नवी सांगवी, पुणे ) याच्याशी नोव्हेंबर २०१९ मध्ये लग्न झाले. लग्नाअगोदर नीलेश हा सरकारी औषध कंपनीत नोकरीला असल्याचे आम्हाला खोटे सांगितले गेले. लग्न जमवताना हुंडा नको म्हणणा-या सासरच्या मंडळींनी साखरपुडा झाल्यानंतर १५ तोळे सोन्याची मागणी केली. लग्न मोडून समाजात बदनामी होऊ नये म्हणून साक्षीचे वडील मुकेश थोरात यांनी लग्नात १० तोळे सोने दिले. लग्नानंतर काही दिवसातच पाच तोळे सोन्यासाठी साक्षीचा छळ सुरू झाला. साक्षीला दिलेले १० तोळे सोने सासरच्या मंडळींनी काढून घेतले. सासरे मोहन सलगर, सासू नंदा सलगर, पती नीलेश सलगर, नणंद अश्विनी मरगळे हे साक्षीचा सतत मानसिक व शाररिक छळ करत राहिले. पैसे आल्यावर पाच तोळे सोने देतो असे साक्षीचे वडील तीला सांगत होते.

साक्षी गरोदर असतानाही तीचा छळ थांबला नव्हता. एके दिवशी नणंद, सासू व पतीने तीला लाथा बुक्यांनी पोटात आणि पाठीत जबर मारहाण केली. त्यानंतर साक्षीच्या पोटात दुखू लागले. सोनोग्राफी केली असता बाळाचे ह्रदयाचे ठोके बंद पडल्याचे सांगण्यात आले. गर्भपात करावा लागला. पती नीलेश हा माहेरी येऊन घटस्फोटासाठी दमदाटी व शिवीगाळ करत आहे. त्यामुळे साक्षीने यवत पोलिसांत तक्रार दिली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT