Pune University Sakal
पुणे

पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यामध्ये अडचणी आल्याने त्यांना गैरहजेरी दाखविण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांना लॉगइन करण्यामध्ये अडचणी आल्याने त्यांना गैरहजेरी दाखविण्यात आले आहे. १३ हजार पैकी तब्बल ९ हजार तक्रारी याच स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयात नापास होण्याची भीती सतावत असताना विद्यापीठाने वस्तुस्थिती तपासून यावर योग्य पद्धतीने निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ‘खऱ्या’ तक्रारी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सुरवातीच्या टप्प्यामध्ये कमी विद्यार्थी असल्याने त्यांना जास्त तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. १६ एप्रिलपासून रोज १०० पेक्षा जास्त विषयांची आणि सव्वा लाख ते दीड लाख विद्यार्थी परीक्षा देत असल्याने त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी हेल्पलाइनला संपर्क साधून परीक्षेसाठी लॉगइन होत नाही, अशा तक्रारी केल्या होत्या. मात्र, या विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा न दिल्याने त्यांची अनुपस्थिती लागलेली आहे. त्यामुळे सध्या तरी हे विद्यार्थी एका विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत, अशीच स्थिती आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात या तक्रारी आल्याने परीक्षा विभागाने १६ ते २० एप्रिल दरम्यान परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत त्यांच्या अडचणी नोंदविण्याची मुदत दिलेली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण १३ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

यापैकी चार हजार तक्रारी सोडविलेल्या प्रश्‍नांपैकी कमी प्रश्न सबमिट झाले आहेत, उत्तर सेव्ह झाले नाही, कमी गुण पडले अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. नऊ हजार तक्रारी या लॉगइन न झाल्यामुळे परीक्षा देता आली नसल्याच्या आहेत. या तक्रारीची व्यवस्थित पडताळणी केली जात आहे.

  • परीक्षेचा कालावधी - ४५ दिवस

  • अपेक्षित विद्यार्थी - ६.२५ लाख

  • परीक्षेसाठी विषय - सुमारे ५४००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT