rain update rain update
पुणे

पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

आतापर्यंत ७१९.२ मिलिमीटरची नोंद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात यंदा आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत जेमतेम सात टक्के पावसाची नोंद झाली. शहरात १ जूनपासून २४ ऑगस्टपर्यंत सरासरी ६७१.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ७१९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत शहरात सात टक्के जास्त पाऊस पडला.

राज्यामध्ये (maharashtra) आतापर्यंत दरवर्षी सरासरी ७७० मिलिमीटर पाऊस पडतो. या वर्षी ८११.७ मिलिमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या पाच टक्के जास्त आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान नसल्याने बहुतांशी ठिकाणी पावसाने उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. २६) कोकणात काही ठिकाणी उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ३५.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

उन्हाचा चटका वाढला

पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३.८ ने वाढून ३१.७ अंश सेल्सिअस नोंदला गेला. पुढील दोन दिवसांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी होईल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT