ACB At Pune RTO  Sakal
पुणे

ACB At Pune RTO : ‘लाचलुचपत’ची कुणकुण; सर्व कामे कायदेशीर, लायसन्स विभागात ‘मार्किंग’ करणारा गायब

सर्व ‘व्यवहार’ कायदेशीरपणे झाले. निरीक्षक कागदपत्रांची बारकाईने तपासणी करू लागले. परिणामी काम पूर्ण होण्यास उशीर झाला.

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद कानडे

Pune News : आरटीओ कार्यालयाकडे एरवी ढुंकूनही न पाहणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सोमवारी (ता. २४) दुपारी आरटीओ कार्यालयात अवतरले. मात्र त्यांची कुणकुण लागल्याने आरटीओ कार्यालयातील ‘झिरो’ कर्मचारी, विशेषतः लायसन्स विभागात ‘मार्किंग’चे काम करणारे ‘गायब’ झाले.

सर्व ‘व्यवहार’ कायदेशीरपणे झाले. निरीक्षक कागदपत्रांची बारकाईने तपासणी करू लागले. परिणामी काम पूर्ण होण्यास उशीर झाला. सोमवारच्या घटनेचा परिणाम दुसऱ्या दिवशीही दिसून आला. मंगळवारी (ता. २५) लायसन्स विभागात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

राज्याच्या परिवहन विभागात ‘फेसलेसची’ सुविधा सुरू आहे. तरी देखील नागरिकांना कामासाठी आरटीओ कार्यालयात खेटे मारावेच लागतात. सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी व अधिकारी आरटीओ कार्यालयात दाखल झाले.

बहुधा याची पूर्वकल्पना असल्याने ‘झिरो’ आणि लायसन्स विभागात ‘मार्किंग’चे काम करणारे नेमून दिलेल्या जागेवरून गायब होते. त्याचा परिणाम लायसन्स विभागातील साहाय्यक व मोटार वाहन निरीक्षकांवर झाला. वाहन परवान्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी सुरू होती. याचा परिणाम कामकाजावर झाला. रात्री आठ वाजेपर्यंत आरटीओ कार्यालयात नागरिकांची गर्दी होती.

सोमवारी काम न झालेले नागरिक मंगळवारी पुन्हा आले. त्यात मंगळवारी ज्यांना स्लॉट दिला होता, असे उमेदवारही उपस्थित होते. त्यामुळे मंगळवारी देखील लायसन्स विभागात नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. या संदर्भात आरटीओची बाजू जाणून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘मार्किंग’च्या उभ्या रेषांचे गणित

  • लायसन विभागात दाखल झालेला अर्ज हा ड्रायव्हिंग स्कूल चालकाकडून, दलाल अथवा कोणाचीही मदत न घेता स्वतः उमेदवार यांच्यापैकी कोणामार्फत आला आहे. हे तपासण्याचे काम मार्किंग करणाऱ्याचे असते.

  • अर्जावर उभ्या रेषा मारण्याचे काम याचेच असते. एक उभी रेष म्हणजे शंभर रुपये, या प्रमाणे उभ्या रेषा मारल्या जातात. त्यानुसार आर्थिक व्यवहार केला जातो.

  • अर्जाचा कोपरा काढून देखील आर्थिक व्यवहार केले जातात, अशा पद्धतीने आलेल्या अर्जावर निरीक्षक फक्त नजर फिरवतात अन अर्ज पुढे सरकतो.

  • सोमवारी यापैकी काहीच झाले नाही. त्यामुळे प्रक्रिया कायदेशीर झाली. मात्र त्यासाठी नागरिकांचा वेळ रांगेत थांबून वाया गेला.

पूर्वी लायसन्स विभागात पुरेसे मनुष्यबळ नव्हते. आता मात्र मनुष्यबळाची कमतरता नाही. पूर्वी दोन हॉलमध्येच अर्जदारांना बसण्याची व्यवस्था होती. वाहन परवाना काढण्यासाठी येणाऱ्या अर्जदारांची एकाच हॉलमध्ये व्यवस्था न करता आणखी एक हॉल उपलब्ध झाल्यास गर्दीची विभागणी होईल.

- विठ्ठल मेहता, ड्रायव्हिंग स्कूल संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT