Accident esakal
पुणे

Pune Accident : कारची तीन मुलींना धडक; एकीची प्रकृती गंभीर

भरधाव कारने तीन मुलींना धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी एरंडवणे भागात कर्नाटक शाळेजवळ घडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भरधाव कारने तीन मुलींना धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी एरंडवणे भागात कर्नाटक शाळेजवळ घडली. या अपघातात तिघी मुली जखमी झाल्या असून त्यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

रसिका धम्म, हर्षदा सावंत आणि महिमा कटारिया अशी अपघातात जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत. या अपघातात रसिका हिच्या जबड्याला गंभीर इजा झाली असून, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, कारचालक वर्षा अमित मराठे (वय ४७, रा. कुमार शांतिनिकेतन, पाषाण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे या कोथरूडमधील निंबाळकर बागेकडून एरंडवणे भागातील गणेशनगरकडे निघाल्या होत्या. स्वप्नशिल्प सोसायटी येथे वळण घेत असताना, त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पदपथावर चढली. त्यामुळे पदपथावरून जात असलेल्या मुलींना कारची धडक बसली.

धडकेमुळे दोन मुली या बाजूला फेकल्या गेल्या. तर एक मुलगी कारच्या चाकाखाली सापडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर नागरिकांनी तिघींना तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास अलंकार पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanar Bauxite Project : 'कोकणच्या लाल मातीवर अन्याय होऊ देणार नाही!' नाणार बॉक्साईट प्रकल्पाची जनसुनावणी होणार रद्द; विरोधानंतर उदय सामंत यांची मोठी ग्वाही

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

SCROLL FOR NEXT