पुणे - रस्ता ओलांडताना झालेल्या अपघाताची नुकसानभरपाई मिळावी म्हणून दाखल केलेला दावा पहिल्याच तारखेला निकाली काढण्यात आला. मृत्युमुखी पडलेल्या ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांना ४ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
लोकअदालतीमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश पी. आर. अष्टुरकर यांच्या पॅनेलने हा दावा निकाली काढला. हा अपघात २५ फेब्रुवारी २०१९ रोजी कोथरूड परिसरात घडला. अपघातात मृत झालेले ज्येष्ठ नागरिक पौडच्या दिशेने पायी चालले होते. त्या वेळी सिमेंट मिक्सरची त्यांना धडक बसली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या कुटुंबीयांनी ॲड. उन्मेष देशपांडे यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरणात रॉयल सुंदरम् विमा कंपनीविरोधात हा दावा दाखल केला होता. कुटुंबीयांनी १४ लाख ७५ हजार नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ लाख २५ हजार रुपये देत हा दावा निकाली काढण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने ऋषीकेश गानू यांनी काम पाहिले. विमा कंपनीच्या कायदेशीर बाबींचे प्रमुख चिन्मय जोशी यांनीदेखील मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.