Accidental death of two youths in Wagholi in six days pune expressway  Sakal
पुणे

Wagholi News : वाघोली परिसरात सहा दिवसात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

पुणे महामार्ग ओलंडत असताना टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद येथील विठाई पेट्रोल पंपाजवळ तीन मार्च रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.

सकाळ वृत्तसेवा

Wagholi News : सहा दिवसात वाघोली परिसरात दोन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. एका अपघातात पादचाऱ्याचा तर दुसऱ्या अपघातात दुचाकी धारकाचा मृत्यू झाला. पुणे महामार्ग ओलंडत असताना टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना लोणीकंद येथील विठाई पेट्रोल पंपाजवळ तीन मार्च रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली.

विकास बाबुराव चव्हाण (वय ३६, रा. लोणीकंद) असे मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तर  दुसऱ्या अपघातात कोलवडी येथे जोगेश्वरी मिसळजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. ७) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली.

निरज भारत दळवे (वय २०, रा. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. प्रकरणी वैभव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाघोली व परिसरात अनेक अपघातांचे सत्र सुरू आहे. केवळ पुणे नगर महामार्गावरच नव्हे तर अंतर्गत रस्त्यावरही अपघात होत आहे.

पादचारी व दुचाकी धारक या अपघातात बळी जात आहे .23 फेब्रुवारीला रात्री 11 वाजण्याच्या सुमारास शशांक धाबेकर हा तरुण टँकरच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा बळी गेला. जड वाहनांचा अती वेग या अपघाताना कारणीभूत ठरत आहे. मात्र या वेगाला लगाम घालणारी यंत्रणाच नाही का असा सवाल नागरिक करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणींना अपात्र ठरवून विश्‍वासघात केला’: बाळासाहेब थोरातांचा आरोप, निवडणुकीनंतर महिलांना दिला धक्का

Numerology : 'या' 4 मुलांकाच्या लोकांच्या हातात अजिबात टिकत नाही पैसा, नको तिथे अति खर्च करून गरजेच्या वेळी होतात कंगाल

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : शिवराज्याभिषेक परवानगीच्या मागणीसाठी तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचा जिल्हाधिकाऱ्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT