court sakal
पुणे

डीएसकेंच्या बंगल्यात चोरीप्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी (डीएसके) यांच्या बंगल्यात चोरी केल्या प्रकरणात एका आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. निमसे यांनी हा आदेश दिला.

सुरेश शंकर धोत्रे (वय ४३, ता. दीप बंगलाचौक) असे आरोपीचे नाव आहे. तर सूरज ऊर्फ चिपाली, फॅन्ड्री, लाला, विशाल विटकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७, रा. गणेशखिंड रस्ता, औंध) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऑक्टोंबर २०१९ ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान ही चोरी झाली. या चोरीत टीव्ही, म्युझिक सिस्टिम, ॲपलचा कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, पिठाची गिरणी, एसी, गिझर असा सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. अटक आरोपी हा सरार्इत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घ्यायचा असून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करायचा आहे. आरोपीस जामीन तो पुढील तपासासाठी हजर राहण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. मुरळीकर यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT