पुणे

हवेली पोलिसांकडून 309 पर्यटकांवर कारवाई

निलेश बोरुडे

किरकटवाडी : शनिवार व रविवार खडकवासला धरण आणि सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी आलेल्या 309 पर्यटकांवर हवेली पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल एक लाख तेरा हजार सहाशे रुपये दंड वसूल केला आहे. पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी हवेली पोलिसांनी खडकवासला धरण, डोणजे येथील गोळेवाडी फाटा व सिंहगडाच्या घाट रस्त्यावरील कोंढणपूर फाटा येथे कडक नाकाबंदी केली होती. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला व आजूबाजूची पर्यटन स्थळे अद्याप पर्यटकांसाठी बंद आहेत. तरीही नियम मोडून अनेक पर्यटक सिंहगड व आजूबाजूच्या परिसरात गर्दी करत होते. मागील आठवड्यातील अनुभवानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार हवेली पोलिसांनी या शनिवारी व रविवारी पर्यटकांना रोखण्यासाठी कडक नाकाबंदी केली होती. यासाठी 3 पोलीस अधिकारी, 22 महिला व पुरुष पोलीस कर्मचारी आणि 10 होमगार्ड जवान तैनात करण्यात आले होते.

हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. 19 जून रोजी पहाटेपासूनच पोलिसांनी नाकाबंदी करण्यास सुरुवात केली होती. शनिवारी दिवसभरात 132 पर्यटकांवर कारवाई करत 47 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला तर रविवारी तब्बल 177 पर्यटकांवर कारवाई करत 66 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. शनिवार-रविवार मिळून एकूण 309 पर्यटकांवर कारवाई करत हवेली पोलिसांनी 1 लाख 13 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी दंड आकारून पर्यटकांना माघारी पाठविण्यात आले‌.

'सकाळ' चे मानले आभार- सिंहगड किल्ला, खडकवासला धरणासह आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांना बंदी असून नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त 'सकाळ'मधून शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे 70% पर्यटकांची गर्दी कमी झाली व पोलिस प्रशासनावरील ताण कमी झाला असे म्हणत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील पाटील यांनी 'सकाळ'चे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT