Drunk-and-Drive 
पुणे

‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत १३ हजार वाहनचालकांवर कारवाई

पांडुरंग सरोदे

पुणे - मद्यपान करून वाहने चालवीत स्वतःसह दुसऱ्यांचा जीव धोक्‍यात घालणाऱ्या १३ हजार वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट मद्यपी वाहनचालकांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

शहराच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या अपघातांमध्ये मद्यपान करून वाहने चालविण्याऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. यामुळे गंभीर अपघात होऊन संबंधित वाहनचालकांसह इतरांचा जीवदेखील जाण्याची दाट शक्‍यता असते. या पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी काही दिवसांपूर्वी आदेश दिले होते. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

रात्रीच्या वेळी शहराच्या विविध रस्त्यांवर विशेष मोहीम राबवून मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत मागील वर्षी ७ हजार ३१० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले होते. यंदा त्याच्या दुप्पट कारवाई करण्यात आली असून, ७ डिसेंबरपर्यंत १३ हजार मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगरला आहे.

दारू प्यायलेल्या दुचाकीस्वाराची धडक बसल्याने माझ्या पायांना दुखापत झाली होती. त्या घटनेत माझा जीव वाचला. दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. 
- किशोर कोळी, औंध. 

काही अपघात हे मद्यपी वाहनचालकांमुळे घडतात. त्यामुळे त्यांच्यावर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत सातत्याने कारवाई होते. कारवाईमुळे अपघात कमी होण्यास मदत होत आहे. 
- शुभदा शितोळे, पोलिस निरीक्षक, नियोजन विभाग, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT