Crime sakal
पुणे

Pune News : खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाई

आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण, आम्ही डॉक्टर-इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी असे भ्रामक दावे करत अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात.

सम्राट कदम

पुणे - आम्ही टॉपर घडवतो, देशातील टॉपर हा आमचाच विद्यार्थी, आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण, आम्ही डॉक्टर-इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी असे भ्रामक दावे करत अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. मात्र, आता अशा खोट्या जाहिराती केल्यास क्लासचालकांवर ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

ग्राहक संरक्षण नियामकांनी (सीसीपीए) खासगी शिकवणी संदर्भातील मसुद्यावर हरकती मागवल्या आहेत. या क्षेत्रात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर नागरिक १६ मार्च पर्यंत सूचना व हरकती पाठवू शकतात. सीसीपीएने कोचिंग क्लासेस, कायदा संस्था, सरकारी आणि स्वयंसेवी ग्राहक संस्थांसह सर्व भागधारकांशी तपशीलवार सल्लामसलत केल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला असल्याचे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

‘मार्गदर्शक तत्त्वे खासगी शिकवणी क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आहेत. शिकवणी क्षेत्रातील कोणालाही ते लागू होतील. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचे नियमन ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ नुसार केले जाईल. प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वे भागधारकांना स्पष्टता आणतील आणि ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करतील.’

कोचिंग संस्थांवर ही बंधने..

- कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेतील यशाचा दर, निवड संख्या किंवा विद्यार्थ्यांच्या मानांकनाबाबत सत्यापित पुराव्याशिवाय खोटे दावे करणे टाळावे.

- विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांची कबुली न देता, विद्यार्थ्यांच्या यशासाठी केवळ कोचिंग जबाबदार आहे, असे भासवू नये.

- विद्यार्थी आणि पालकांमध्ये अशी खोटी भावना निर्माण करू नये की कोचिंग अत्यावश्यक आहे.

- कोचिंग संस्थांनी अशा कोणत्याही गोष्टीत गुंतू नये, ज्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होईल किंवा ग्राहकांची स्वायत्तता नष्ट होईल.

- कोचिंग सेंटर्सने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कोचिंगचा सहभाग किती प्रमाणात आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT