crime esakal
पुणे

Pune Crime : वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यास अटक

कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास अटक.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - धन्वंतरी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या हस्तांतराबाबत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख (रा. कोल्हापूर) यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात फिर्यादी परिक्षीत नामपूरकर यांनी पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलिस निरीक्षक विशाल मोहिते यांच्या पथकाने आरोपी संजोग देशमुखला अटक केली.

तर, महादेव देशमुख मार्च २०२२ पासून फसवणुकीच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) कोठडीत आहे. आरोपी देशमुखला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने आरोपीला १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी कामकाज पाहिले. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT