पुणे

प्रशासकाच्या अंकुशाविना शाळा 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शहरातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश नाकारल्यास कारवाई करण्यासाठी शाळांवर प्रशासक नेमण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, अद्याप मनुष्यबळाअभावी बहुतांशी शाळांवर प्रशासकच नेमले नाहीत. 

यंदा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 1 हजार 883 मुले प्रवेशाविनाच आहेत. काही शाळांच्या प्रशासनाने पालकांना सोबत अरेरावीची भाषा करत अपमानास्पद वागणूक दिलेली आहे. 25 टक्के कोट्यातील हक्काचे शिक्षण मिळविण्यासाठी पालकांना शाळा आणि शिक्षणाधिकारी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. या सर्व प्रकारात शाळांनी प्रवेश नाकारल्याने पालकांना फटका बसत आहे. शिक्षण विभागाकडे पालकांनी तक्रार केल्यावर आरटीईअंतर्गत मुलांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांना नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात कुठल्याही शाळेची मान्यता रद्द केली नसल्याचे चित्र आहे. 

या वर्षी पाचव्या फेरीनंतरही तीन हजार 155 कोट्यातील जागांपैकी 1 हजार 883 बालके प्रवेशाविनाच आहेत. प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले होते; परंतु वर्ष संपण्याच्या मार्गावर असतानाही शाळांनी अद्याप प्रशासक नेमला नाही. त्यामुळे आरटीईनुसार प्रवेश मिळण्याचा मार्ग धूसर झाला आहे. 

आरटीईपात्र शाळा - 175 
शाळांची नोंदणी - 107 
रिक्त जागा : 529 
मुलांची निवड : 4 हजार 796 
शाळांचा कोटा : 3 हजार 155 जागा 
मुलांना प्रवेश : 2 हजार 636 
मुले प्रवेशाविना : 1 हजार 883 

शहरपातळीवर गरज भासली नसल्याने प्रशासक नेमले नाहीत. प्राप्त तक्रारींचे निवारण केले आहे. 
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग 

खासगी शाळांवर प्रशासक नेमण्याऐवजी शासकीय शाळांवर प्रशासक नेमण्याची गरज आहे. कारण त्यांच्याच कारभारात गोंधळ आहे. तसेही सरकारकडे मनुष्यबळ कमी आहे. 
- जागृती धर्माधिकारी, सल्लागार, इंडिपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT