अंकिता पाटील ठाकरे यांचा सत्कार करताना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. Sakal
पुणे

अंकिता पाटील यांना अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार

सामाजिक कार्याबद्दल गौरव

डॉ. संदेश शहा

इंदापूर - पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तसेच इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांना मुंबई राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला. अंकिता पाटील ठाकरे यांना सामाजिक कार्याबद्दल यावेळी सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत अंकिता पाटील ठाकरे यांचा सन्मान झाला.

यावेळी अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या, अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवीहोळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार प्राप्त झाल्याने आनंद होत आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा तसेच जबाबदारी म्हणून त्यांच्या प्रमाणे सामाजिक कार्य करण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी यानिमित्त दिली. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या पुरस्काराबद्दल अंकिता पाटील ठाकरे यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढला, सात महिन्यांची थकबाकीही मिळणार

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू! रक्षाबंधनापासून अंमलबजावणी, राज्य शासनाची अधिसूचना जारी

IND vs SL, Test: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! चौथ्या दिवशी फलंदाजी गडबडली, पण गोलंदाजांनी राखले वर्चस्व

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Mangalwedha News : मंगळवेढ्यात धनश्री मल्टीस्टेटने गाठला 1500 कोटी ठेवींचा टप्पा

SCROLL FOR NEXT