PNE26W20442 सोलापूर : अहिंसा गोशाळेत आसावा परिवारातर्फे गो अन्नकूट व श्रीकृष्णांना ५६ भोग अर्पण करण्यात आले.
आसावा परिवाराकडून गोमातेला ५६ भोग आणि अन्नकूट अर्पण
अहिंसा गोशाळेत अधिकमासानिमित्त पूजन; गो-अन्नकूट साजरा करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : पवित्र ज्येष्ठ अधिक मासानिमित्त भोगाव येथील अहिंसा गोशाळेत आसावा परिवाराच्या वतीने गोमातेचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी गोशाळेतील गोमातेसाठी ‘५६ भोग’ तसेच ‘गो-अन्नकूट’ अर्पण करण्यात आले.
हिंदू धर्मात अधिक मासात केलेल्या गोसेवेला विशेष महत्त्व मानले जाते. याच भावनेतून आसावा परिवाराने गायींना ५६ प्रकारच्या विविध पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करून अनोखी सेवा साकारली. भगवान श्रीकृष्ण आणि गोमातेच्या आवडीचे विविध पदार्थ गायींना अर्पण करण्यात आले. पूजनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
गो-अन्नकूट परंपरेचे स्मरण
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा करून ब्रजवासीयांचे रक्षण केले होते. त्याच परंपरेचे स्मरण म्हणून गोशाळेत भव्य अन्नकूट सजविण्यात आला होता. या धार्मिक विधीमुळे परिसरात सुख, समृद्धी आणि संपन्नता लाभते, अशी श्रद्धा व्यक्त करण्यात आली.
नागरिकांना आवाहन
‘गावो विश्वस्य मातरः’ म्हणजे गाय ही विश्वाची माता आहे. सर्व सोलापूरकरांनी अधिकमासाचे औचित्य साधून गो-अन्नकूट साजरा करावा. अहिंसा गोशाळेला कुटुंबासह भेट देऊन गोमातेचे दर्शन घ्यावे. तसेच मुलांमध्ये गोसेवेचे संस्कार रुजवून गोसेवेचा संकल्प करावा,” असे आवाहन आसावा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.