पुणे

कॉलेज

CD

PNE26W43710
अहिल्यानगर ः अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये निदर्शने करताना विद्यार्थी.

होमिओपॅथिक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने

वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनीच्या मृत्यूचा आरोप

अहिल्यानगर, ता. २० ः सावेडी परिसरातील अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी विद्यार्थिनी गायत्री अवताडे हिचा दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने महाविद्यालय परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपचाराच्या वेळी आवश्यक ऑक्सिजन, तसेच अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नसल्याने गायत्रीला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी आज कॉलेजसमोर निदर्शने केली.
गायत्रीच्या मृत्यूला दोन दिवस उलटूनही कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थांनी आज निदर्शने केली. गायत्री हिची प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने कोणत्या वैद्यकीय सुविधा देण्यात आल्या, महाविद्यालयात आपत्कालीन उपचारांसाठी आवश्यक ऑक्सिजनची व्यवस्था होती का, अत्यावश्यक उपकरणे उपलब्ध होती का आणि उपचार प्रक्रियेत हलगर्जीपणा झाला का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. महाविद्यालयात आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपचारांची पूर्ण तयारी असणे गरजेचे आहे. मात्र, गायत्रीची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला आवश्यक सुविधा वेळेत मिळाल्या नाहीत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. गायत्रीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, महाविद्यालयातील आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची तपासणी करावी आणि चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. यावेळी कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, गायत्री हिच्या मृत्यू प्रकरणी चौकशीला सामोरे जाण्यास तयारी असल्याचे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धावत्या लोकलमध्ये आसनावरून वाद, नंतर धक्काबुक्की अन्... ६२ वर्षीय प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू

J&K High Court Bench: लडाखमध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टची बेंच स्थापन होणार! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा

CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

Marwade Bypass : मरवडे बायपास मागणी आंदोलनात वाहतूक अडथळा; 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, सनदशीर आंदोलनाला शिक्षा?

Latest Marathi News Live Update: बालवडकरांनंतर टिंगरेंचाही निधी घेतला काढून, स्थायी समितीत भाजपाच निर्णय

SCROLL FOR NEXT