पुणे

अभिनेता अजय देवगण यांच्या जुहूमधील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा :

CD

अजय देवगण यांच्या
बेकायदा बांधकामावर हातोडा
मुंबई, ता. १७ : जुहू येथील कपोल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील अभिनेता अजय देवगण यांच्या बंगल्यात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाईचा हातोडा चालवला. पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बंगल्याच्या अंतर्गत भागात भिंती, खिडक्या आणि संरचनेत फेरबदल केले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिकेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन हे अनधिकृत बांधकाम निष्कासित केले. या बंगल्याच्या व्यावसायिक वापरावरून स्थानिक रहिवासी आणि देवगण कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असून, पालिकेच्या या कठोर कारवाईमुळे हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
​जुहू येथील एन. एस. रोड क्रमांक ११ वरील एस-१० या भूखंडावर अजय देवगण यांचा सुमारे सात हजार ८०२ चौरस फुटांचा आलिशान बंगला आहे. या बंगल्यात महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाची कोणतीही मंजुरी न घेता अंतर्गत बदल केले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी पालिकेने १० सप्टेंबरला ‘काम थांबवा’ नोटीस बजावली होती. ​या नोटीसवर स्पष्टीकरण देण्यासाठी देवगण कुटुंबीयांनी पालिकेकडे चार आठवड्यांची मुदत मागून घेतली होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही आवश्यक परवानग्या किंवा संबंधित कागदपत्रे पालिकेकडे सादर करण्यात आली नाहीत. अखेर मुदत उलटून गेल्याने महापालिकेच्या पथकाने बंगल्यात प्रवेश करून अनधिकृत बांधकामाचा भाग तोडून टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Row : विधानभवनात व्हिजिटर पासेसवरून मोठा वाद! उपसभापती सचिन अहिर आणि उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंच्या अधिकारांना कात्री

IND vs WI 5th T20I: ५-५ षटकांचा सामना? पावसाचा धुमाकूळ... किती वाजता टॉस, मॅचची वेळ... घ्या जाणून Cut off टाईम...

२४ तास तुरुंगात राहिल्यानंतर कसं वाटलं? अभिजीत दीपकेंनी शेअर केला शाहरुख खानच्या चित्रपटातील सीन

Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; अडीच ते तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा, ट्रेलर बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा

Latest Marathi News Live Update : ग्राहक महिलेने लांबविले मंगळसूत्र श्रीरामपूर येथील घटना; पोलिसांत तक्रार दाखल

SCROLL FOR NEXT