पुणे

सातारा अजिंक्यतारा कारखान्यातील कामगारांना १९ टक्के बोनस जाहीर

CD

अजिंक्यतारा कारखान्यातील
कामगारांना १९ टक्के बोनस जाहीर

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची प्रगती आणि सभासद-शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न साध्य झाले असून, कारखान्याच्या चढत्या आलेखात कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. यंदाही कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर १९ टक्के बोनस जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
कारखान्याच्या अडचणीच्या काळातही कामगार-कर्मचाऱ्यांनी नेहमीच कारखान्याच्या हिताचा निर्णय घेऊन कामकाज केले आहे. ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या एकजुटीमुळेच आज कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला आहे. कामगार आणि व्यवस्थापनाचे सौहार्दपूर्ण संबंध जपत कारखान्याने जास्तीत जास्त बोनस देण्याची परंपरा या वर्षीही अखंडित राखली आहे.
कामगार युनियनशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून, बोनसची एकूण ३ कोटी ६७ लाख रुपयांची रक्कम येत्या दोन दिवसांत सर्व अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या बँक खात्यात थेट एकरकमी वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून यावेळी कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Statement : सांगली जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीचा पदवीधर निवडणुकीवर परिणाम? विश्वजीत कदम स्पष्टच म्हणाले!

Dausa Case: अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार..अचानक झाली प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Sonia Gandhi : सोनिया गांधींची इंस्टाग्रामवर इंट्री, ३ तासांत ५९ हजार लाईक्स अन् १३ हजार फॉलोवर्स; नव्या सुरुवातीची राजकीय वर्तुळात चर्चा

Latest Marathi News Live Update : सौरव दास, आशुतोष रांका आज दिल्ली पोलीस गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

मुलांना 'नीट बोल' म्हणून टोकताय? 'या' दबावामुळे वाढते तोतरेपणाची भीती; शाळेत १०० पैकी ५ मुलांमध्ये दिसतात 'ही' लक्षणे...

SCROLL FOR NEXT