Ajit Pawar Marathi Latest News Ajit Pawar Marathi Latest News
पुणे

...तर १६ आमदारांच्या बाबत वेगळा निकाल लागू शकतो - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सोमवारी (ता. ११) शिंदे गट व उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जण उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, तर काही जण शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल असे म्हणत आहे. मात्र, मी ज्या वकिलांशी चर्चा केली त्यानुसार पक्षांतर बंदी कायद्याचे तंतोतंत पालन केले तर १६ आमदारांच्या बाबत वेगळा निकाल लागू शकतो, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. (Ajit Pawar Marathi Latest News)

एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि ठाकरे कॅम्पमधील १४ आमदारांना (MLA) नोटिसा मिळाल्या आहेत. सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत.

यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार बोलत होते. पक्षांतर बंदी कायदा काय सांगतो? त्या कायद्याची भूमिका काय आहे? सुप्रीम कोर्टात त्यासंदर्भातील प्रश्न आहेत. सुप्रीम कोर्ट निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. सुप्रीम कोर्ट विचारपूर्वक निर्णय देईल. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच मूळ शिवसेना आहे, असे आम्हाला वाटते, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सुप्रीम कोर्टात १२ जूनला सुनावणी

ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय (OBC Reservation) स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ नये. ओबीसी समाजाच्या संदर्भातील आरक्षण न देता या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणासहित स्थानिक स्वराज संस्था निवडणुका व्हाव्यात ही आमची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टात १२ जूनला सुनावणी आहे, असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT